शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भू-विकास बँकेकडे शेतकऱ्यांचे हेलपाटे

By admin | Updated: June 18, 2014 01:28 IST

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़

बिलोली : अठरा वर्षापासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असलेल्या भू-विकास बँकेकडे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बिलोली शाखेकडे हेलपाटे सुरू झाले आहेत़ दरम्यान, बिलोली, धर्माबाद, उमरी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बिलोलीत पायपीट करावी लागत आहे़ एकाच बँक कर्मचाऱ्यावर भार असून ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत़शेतकऱ्यांची बँक म्हणून भू-विकास बँक परिचित होती़ पण बुडीत कर्जामुळे बँकेचे दिवाळे निघाले़ सन १९९६ मध्ये बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद झाले़ पीक कर्ज देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बँका सरसावल्यामुळे भू-विकास बँकेचे महत्त्व घटले व ही बँक केवळ नावाकरिता उरली़ पण शेती कर्जासाठी या बँकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नवीन कर्जधारकांना बँकेकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़बिलोली, नायगाव व धर्माबादसह उमरी तालुक्यातील जवळपास २५० गावांसाठी बिलोलीची भू-विकास बँक होती़ परिणामी अशा गावातील शेतकऱ्यांना या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवयक झाले़ १९९६ पासून सर्व आर्थिक व्यवहार बंद असले तरी पूर्वी दिलेल्या कर्जासाठी सदरील प्रमाणपत्र आवश्यक आहे़ अशा स्थितीत चार तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे येवून प्रमाणपत्र घ्यावे लागते़ पूर्वी तर येथे रांगाच रांगा लागत़ बँकेचे व्यवहार बंद झाल्याने केवळ एकच कर्मचारी येथे बसून राहतो़ सध्या पीक कर्जासाठी धावपळ सुरू झाली आहे़ अशा स्थितीत प्रमाणपत्र घेण्यासाठी बँकेकडे फिरकावे लागते़ या संदर्भात बँकेत चौकशी केली असता चार तालुक्यातून आजही बाराशे शेतकऱ्यांच्या नावे कर्ज थकित आहे़ अशा खातेदारांत बहुसंख्य शेतकरी हयात नाहीत़ पण जमीन, मालमत्ता, शेती वारसा प्रमाणे मालक बदलले आहेत़ काहींनी बँकेचे कर्ज असतानाही शेतीविक्री केली आहे़ परिणामी शेतकऱ्यांना एकदा ना एकदा येथे येवून प्रमाणपत्र घ्यावेच लागते़ चाळीस वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराची कागदोपत्री नोंद येथे आहे़ एखादा शेतकरी संबंधित शेतीचा सातबारा आणला की संपूर्ण नोंदी तपासाव्या लागतात़ मालकांच्या हक्कात बदल झाल्याने बारकाईने पाहणी करावी लागते़ त्यामुळे २ ते ४ दिवस जातात़ बँकेचे व्यवहारच अठरा वर्षापापासून बंद असल्याने आॅनलाईन व्यवहाराचा येथे फायदाच होत नाही़ एकीकडे पीककर्ज, सातबारा आॅनलाईन होताना येथील बंद झालेल्या बँकेत तीच ती जिर्ण कागदपत्रे तपासून अधिकारी वैतागले आहेत़ शेतकरी मात्र गांधीनगरच्या भागात येवून बंद बँकेचा शोध घेवून हैराण होत आहेत़ (वार्ताहर)आजही बाराशे शेतकरी बँकेचे कर्जदार आहेत़ कर्जावर व्याज लावल्याने रकमेत वाढ झाली आहे़ कर्जदारांचे सातबारे बदलले असल्याने सर्व्हेनंबर व गटनंबर तपासावे लागतात व प्रमाणपत्र द्यावे लागते़ केवळ पीक कर्जाच्या वेळीस गर्दी होते - जी़एल़ पवार, बँक अधिकारी, बिलोली़ चार तालुक्यातील बँकांना बाराशे थकबाकीदारांच्या सर्व्हे नंबरची यादी पाठवावी़ जेणेकरून शेतकऱ्यांना प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता पडणार नाही़ आॅनलाईनवर सर्व्हेनंबरची नोंद झाल्यास आपोआपच सर्व बँकांना यादी कळेल - आबाराव संगनोड, अध्यक्ष, शेतकरी खरेदी विक्री संघ बिलोली