शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जाचक जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा आखडता हात

By admin | Updated: September 15, 2015 00:25 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई तांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईतांत्रिक अडचणीत अंबाजोगाई तालुक्यात ४३८ विहिरींचे काम रखडले आहे तर शेततळ्याचे २६ प्रस्ताव पाठविण्यात आले. मात्र त्यातील तेराच शेततळ्यांना मंजुरी मिळाली आहे.दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या पंचायत समिती व कृषि विभागाच्या माध्यमातून एम.आर.ई.जी.एस. यांच्या वतीने शेततळी व विहिरींना अनुदान देऊन जमीन ओलिताखाली आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु रोहयोच्या माध्यमातून कामे करतांना जॉबकार्ड व इतर जाचक अटींमुळे मंजुरी मिळूनही कामे केली जात नाहीत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी व शेतमजुरांना त्या-त्या गावांमध्ये रोजगाराची उपलब्धी व्हावी यासाठी एम.आर.ई.जी.एस. च्या माध्यमातून गावोगावी विहिरी व शेततळे निर्मितीसाठी अनुदान दिले जाते. या कामांच्या माध्यमातून मजुरांना काम तर शेतकऱ्याची जमीन सिंचनाखाली यावी. हा प्रमुख उद्देश असतो. परंतु शासनाच्या जाचक अटी व लालफितीच्या कारभारामुळे या योजना पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशाही स्थितीत मंजूर झालेल्या योजनेचे काम पूर्ण होऊन त्या योजनेचे अनुदान मिळेपर्यंत शेतकऱ्यांस किमान दोन वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कृषि विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ४७० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे झाली नाहीत. या वर्षी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २६ शेततळ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातील १३ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही कामे आता सुरू करण्यात येणार असल्याचे कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आले. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतात विहिर घेण्यासाठी अनुदान दिले जाते. आजपर्यंत १३६० विहिरींना मंजुरी मिळाली त्यापैकी ९७१ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. ४३८ विहिरींचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडले आहेत. आगामी काळात २०० विहिरींना मंजुरी मिळाली आहे. तर ९८ विहिरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करतांना जॉबकार्ड व विविध तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्यामुळे ही कामे मार्गी लागेपर्यंत त्यातच मिळणारा निधी हे अग्निदिव्य पार करतांना शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते.