शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखांकडे मांडल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा..!

By admin | Updated: May 8, 2017 00:16 IST

जालना : मराठवाडा शिवसंपर्क अभियानास मार्गदर्शन करण्यासाठी औरंगबाद येथे आलेले उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा शिवसंपर्क अभियानास मार्गदर्शन करण्यासाठी औरंगबाद येथे आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती जालना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी मांडली.यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, भगवान कदम, रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, परमेश्वर जगताप, माधवराव कदम, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, सुरेश बोरसे, बाबासाहेब तेलगड, प्रसाद बोराडे आदींची उपस्थिती होती. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत, तूर खरेदी, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आदी समस्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर रविवारी समस्या मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथे शिवसंपर्क अभियान दौऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील शिवसेनेची मागील दोन वर्षांतील आंदोलन, मोर्चे, धरणे, रास्ता रोको असे विविध आंदोलनांसदर्भात माहिती दिली. सध्या तूर खरेदी विक्र ी केंद्र बंद असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक टंचाईत सापडला आहे. चार वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदर शेतकरी होरपळून निघाला आहे. त्यातच शासनाचे हे जुलमी धोरण शेतकरऱ्यांना आणखीनच मेटाकुटीस आणत आहे. या मेटाकुटीपासून शेतकऱ्यांना दूर करण्यासाठी आपण तात्पर प्रयत्न करतो.यासाठी नेहमीच शेतकरी शिवसेनेच्या पाठीशी उभा राहता. गत काही महिन्यांत अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. सरकारचे दुटप्पी धोरण वाढत्या शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरत असल्याचा आरोपही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केला.