शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार धनादेशाद्वारे मालाचे पैसे

By admin | Updated: November 16, 2016 00:13 IST

जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे.

जालना : आठवडाभरापासून पाचशे व हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वच व्यवहारावर परिणाम होत आहे. यात बाजार समितीही सुटलेली नाही. शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. जालना बाजार समितीत भुसार, किरणा, भाजीपाला, कापूस, सोयाबीन, मोसंबी आदी बाजारपेठेत दिवसाकाठी कोट्यवधींची उलाढाल होते. शेकडो शेतकरी दिवसाकाठी विविध धान्ये भुसार बाजारात आणतात. शेतकऱ्यांना माल विक्री केला लगेच पैसे मिळत. मात्र हजार व पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्या त्यासोबचत नवीन चलनाचा तुटवडा भासत आहे. रोख रक्कम शेतकऱ्यांना देणे व्यापाऱ्यांना जिकिरीचे होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची जी काही माल विक्रीची रक्कम आहे ती धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडूनही या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा बँकेत खाते असतेच. यामुळे धनादेश दिला म्हणजे काही अडचण येण्याचा प्रश्न नाही. थेट पैसे खात्यात जमा होतात. गत काही दिवसांपासून सोयाबीन व कापसाची आवक होत आहे. सोयाबीनच मंगळवारी ४ हजार १७५ तर मका ४५३८ एवढी आवक इतर शेतीमालाची आवकही बऱ्यापैकी होत आहे.यामुळे शेतकरीही धनादेश स्वीकारत असल्याचे आडत व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार समिती यार्डात खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस सुरू आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कापसाची रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव गणेश चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)