शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात मदतीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST

पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी

पाटोदा : जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी बालाघाट विकास आघाडीच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी उपविभागीय कार्यालय दणाणले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर हा भाग डोंगरी विभागात येतो. येथे दरवर्षीच पावसाचे प्रमाण अल्प असल्याने येथील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. यामुळे येथे शेतकरी सतत आर्थिक संकटात असतात. कधी दुष्काळ तर कधी गारपीट याने शेतकरी अधिकच खचलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाचे प्रमाण अल्प असले तरी सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. पेरणीनंतर पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे, मशागत यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज घेतले आहे. पाऊसच नसल्याने हे कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, पीक कर्जाला व्याज न लावता नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांतून विहिरी खोदल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे अद्याप पैसेच न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यामुळे या विहिरींचे पैसे देण्याची मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. पाटोदा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणावर आहेत. या शेतकऱ्यांना कांदाचाळसाठी अनुदान द्या, अशी मागणीही यावेळी केली. पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. २०० पेक्षा अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या द्वारे दुषित पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, पशुधनासाठी छावण्याऐवजी शेतकऱ्यांना रोख रक्कम मदत द्यावी.पन्नास वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली. गंभीर बाब म्हणजे दुष्काळाच्या भयाने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात वाढू नये यासाठी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलकांमध्ये बालाघाट विकास आघाडीचे प्रमुख विष्णुपंत घोलप, राजाभाऊ देशमुख, दिलीप रंधवे, पांडुरंग दगडखैर, राहूल चौरे, महादेव नागरगोजे, हरिदास शेलार, बाळासाहेब जायभाये, महेश आजबे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रभारी तहसीलदार भारत सूर्यवंशी, गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)