शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच...!

By admin | Updated: August 8, 2016 00:39 IST

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.आडत पट्टी वसुलीवरून दहा ते बारा दिवस समितीतील खरेदी विक्री बंद होती. काही दिवस शेतकऱ्यांनी थेट भाजीपाल्याची विक्री केली. आता संप मिटल्याने भाजीपाला विक्री पूर्ववत झाली असली तरी कमिशन तसेच शेतकऱ्यांची पहिल्यासारखीच लूट होत आहे. दहा टक्के कमिशनपैकी हमालीचे दोन टक्के कमिशन घेतले जाते. मात्र, काही भाजीपाला व्यापारी शेतकरी व खरेदीदार यांच्याकडून जादा भाव देण्याचे आमिष दाखवून रक्कम उकाळत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जालना बाजार समितीत परिसरातील ४० खेड्यातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. शेतकरीही जादा भाव मिळेल म्हणून व्यापाऱ्यांना काही रक्कम देण्याचे आश्वासन देतात. असे असले तरी काही व्यापारी तुमचा माल कच्चा आहे, दर्जा चांगला नाही म्हणून शेतकऱ्यांना भीती दाखवतात. जास्त भाव पाहिजे असेल तर एवढे कमिशन द्या, असा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हमाली वगळता इतर कोणतेही पैसे देऊ नये असे असतानाही काही व्यापारी शेतकऱ्यांचा गैर फायदा घेत आहेत. व्यापारी प्रति शेतकऱ्यांनी शंभर ते पन्नास रूपये कमिशन उकळत असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, बुधवारी जवाहर बाग परिसरात तर रविवारी गांधी चमन भागात भाजीपाला बाजार भरत असल्याने शेतकरी थेट येथे मालाची विक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना जादा कमिशन देण्याचा प्रयत्न नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कमिशन देऊ नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)