शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वीज तोडणार

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.यावर्षी मोसमी पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. ती तीव्र होण्याची चिन्हे लक्षात घेता सर्व प्रकल्पातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर चालत असलेले कृषी पंप त्वरित बंद करून त्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, लघु तलाव, नदीनाले, विहिरी इ. पाण्याचे उद्भवातून अनधिकृत पाण्याचा उपसा होत असल्यास तो बंद करण्यात यावा. अवैध उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश तालुका प्रशासनास देण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फळ पिकांच्या बागा मेहनतीने उभ्या केल्या आहेत. गतवर्षी दुष्काळात पदरमोड करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून मोसंबी, डाळिंब बागा जगवल्या त्या नंतर गारपिटीने या बागांना फटका दिला आहे व आता पाणीपुरवठा बंद होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात अस्वस्थता पसरली आहे. काहीही झाले तरी यास आम्ही विरोध करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)एमआयडीसीला फक्त २० टक्के कपात राज्य शासनाने पाण्याचा प्राधान्य क्रम ठरवताना पिणे, शेती व उद्योग असा ठरवला आहे. असे असताना एमआयडीसीची फक्त २० % पाणी कपात केली आहे. मग शेतकऱ्यांचा १०० % पाणीपुरवठा कोणत्या आधारावर बंद करता, अशी भूमिका शेतकऱ्यांचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी घेतली असून शेतकऱ्यांची सुद्धा २० % पाणी कपात करा नाहीतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.