शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे उद्दीष्ट दीडपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:20 IST

लातूर : मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे़ १ हजार ९२३ शेततळ्याचे उद्दीष्ट असतानाही

लातूर : मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे़ १ हजार ९२३ शेततळ्याचे उद्दीष्ट असतानाही एकूण ३ हजार ९४४ शेतकऱ्यांचे अर्ज कृषी कार्यालयाकडे आॅनलाईन दाखल झाले आहेत़ टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एकूण उद्दीष्टापेक्षा दीडपट शेततळी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे आणखी ५० टक्के शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळणार आहे़मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या प्रक्रियेला तात्काळ मंजुरी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ लातूर जिल्ह्यात कृषी विभागाअंतर्गत सुरु केलेल्या शेततळ्यासाठी १५ बाय १५ बाय २३, ३० बाय ३० बाय ३ या दोन साईजमध्ये शेततळ्याचा क्रायटेरिया ठरविण्यात आला आहे़ मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यासाठी ७/१२, ८/अ, बँक पासबुक व २० रुपये फिस भरून आॅनलाईन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे़एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत ३ हजार ९४४ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत़ दिलेल्या १ हजार ९२३ शेततळ्याच्या उद्दीष्टापेक्षा दीड पटीने शेततळ्यास मंजूरी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांतून या प्रक्रियेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे़ अद्यापपर्यंत १ हजार ९२३ शेततळ्यांना मंजुरी दिली आहे़ या संख्येच्या दीडपट आणखी १ हजार शेततळ्यांना मंजुरी दिली जाणार आहे़ या शासनाच्या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आधार मिळणार आहे़ शेततळ्याला मंजुरी मिळाल्यानंतर शेततळ्याची वर्क आॅर्डर निघणार व त्यानंतर शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़ त्यामुळे मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे़ शेततळ्याचे शासन अनुदानातून होत नसतानासुध्दा शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे़ वाढीव अनुदानाची मागणी शेतकऱ्यातून होत आहे़ (प्रतिनिधी)