शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

शेतकरी आत्महत्या थांबेना!

By admin | Updated: August 17, 2015 01:03 IST

गंगाराम आढाव/जालना : जिल्ह्यात सलग मागील तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सलग चौथ्यावर्षीही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

गंगाराम आढाव/जालना : जिल्ह्यात सलग मागील तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना सलग चौथ्यावर्षीही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच आर्थिक अडचणीत सापडलेलाा शेतकरी आत्महत्येचा मार्ग अंवलबित आहेत. नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असून, त्यातील २६ आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाकडून मदत देण्यात आली. शेतकऱ्यांना मदत देण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या फायली तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात आहेत. त्याकडे कोणी लक्षही द्यायला तयार नसल्याची बाब समोर आली आहे.जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये श्रीमंता पुंडलिक गावडे ( रा. टाकळी ता. भोकरदन), पंडीत पांडूरंग गावडे (रा.भायडी ता. भोकरदन), रामप्रससाद उत्तमराव कांगणे (रा. रानमळा ता. मंठा), देवीदास किसन लोखंडे ( रा. लिंगेवाडी ता. भोकरदन), दत्ता श्रीरंग काकडे (वलखेड ता. परतूर), प्रल्हाद शिवसिंग जारवाल ( तडेगाव वाडी ता. भोकरदन), विशाल विठ्ठल नन्नवरे ( देव पिंपळगाव), एकनाथ संपत लकडे ( हडप ता. जालना), बबन रावसाहेब गायकवाड (अंबड), सुमनबाई मदनराव यादव ( लिंगसा ता. परतूर), प्रकाश अन्नासाहेब लहाणे (भायडी ता. अंबड), ज्ञानदेव नामदेव डोंगरे (नजीक पांगरी ता. बदनापूर), सुखदेव भीका जाधव (पेरजापूर ता. भोकरदन), विश्वनाथ रायभान बेरसाल (लोणी खु. ता. परतूर), संदीप सदाशिव नागरे (वाहेगाव श्रीष्टी ), रामभाऊ सावळीराम भुंबर (येणोरा ता. परतूर), राजेश दत्तराव सरोदे ( उस्वद ता. मंठा), शांताराम त्र्यंबक जाधव ( सावखेडा ता. भोकरदन), सुदाम दामोधर फदाट (बोरगाव बु. ता. जाफराबाद), देवीदास उद्धव काळे (बाबुलतारा ता. परतूर), सुदाम धिसिंराम भोकरे ( परतूर), कैलास विष्णू उगले( राजेवाडी ता. घनसावंगी), प्रभू भीमराव पाटोळे (राजंणीवाडी ता घनसावंगी), राजेंद्र विश्वनाथ आडसुड (गेवराईबाजार ता. बदनापूर), कारभारी गीरजा मैद (रा. झिरपी ता. अंबड), शेषराव हरी गवळी (वालसांवगी ता. भोकरदन), रामभाऊ लहानुजी कांबळे (उस्वद ता. मंठा) रामेश्वर उद्धवराव मोरे (रा. देवठाणा ता. मंठा) यांंचा समावेश आहे. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ उपाययोजना आखण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या सुमारे १५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत शासकीय मदत मिळालेली नाही. त्यांच्या आर्थिक मदतीच्या फायली तहसीलव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहे. जालना तहसील कार्यालयात तीन शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव असलेल्या फायली धूळखात आहे. त्यात भगवान गुमाजी शेळके (रा बोरखेडी) यांनी १९ जून रोजी आत्महत्या केलेली आहे. तसेच तुळशीराम प्रभू राठोड (रा वडीवाडी) यांनी २५ जुलै रोजी आत्महत्या केली. राधा भगवान जाधव (माळशेंद्रा) या शेतकरी महिलेने २० एप्रिल रोजी आत्महत्या केलेली आहे. या तीन प्रस्तावांचा समावेश आहे. तर भोकरदन तालुक्यातील बाबूराव सटवाजी तरमाळे (रा पिंपळगाव थोटे), केशव विश्वनाथ शिंदे (रा. कोसगाव), कृष्णा श्यामराव बोराडे (अवघडराव सावंगी), प्रकाश आनंदा गोरे (रा. हिसोडा) या चार शेतकऱ्यांचे, घनसावंगी तालुक्यातील रमेश गणेश शिंदे (देवी दहेगाव), अण्णाभाऊ विश्वनाथ अस्वले (रा. करडवाडी), दिंगबर राजेभाऊ आधुंडे (रा. सिंधखेड), भास्कर आसाराम ढवळे (रा. अंतरवाली राठी) तसेच जाफराबाद तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांच्या कुंटुबियांना अद्याप शासकीय मदत देण्यात आलेली नाही.