राजू वैष्णव , सिल्लोडपीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असला पाहिजे, अशी नवीन अट राष्ट्रीयीकृत बँक ांकडून लादली जात असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी मात्र पीक कर्ज देताना अशी अट नव्हती. यावर्षी बँकांकडून नवीन नियम व अट लागू क रून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याने ‘भिक नको; पण कुत्रे आवर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदराने प्रति एकर १३ ते १५ हजार रुपये पीक कर्ज दिले जाते. दरवर्षी शेतकरी जुने पीक कर्ज भरून नवे वाढीव कर्ज घेतात. दरवर्षी बहुतांश शेतकरी पीक कर्ज नवे-जुने करतात. सध्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक कर्ज नवे-जुने करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर सोसायटीचे कर्ज असल्याने त्याचा बोजा सातबाऱ्यावर आहे; परंतु बँकांकडून यावर्षी सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असला पाहिजे, असा नवीन नियम लागू केल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे सलग दोन वर्षांपासून आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. तरीदेखील पीक कर्ज नवे-जुने करण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव केली; परंतु बँकांकडून नवीन नियम लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गेल्या वर्षी पीक कर्ज देताना सोसायटीच्या बेबाकी प्रमाणपत्रावर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. यंदा मात्र सोसायटीची बेबाकी व सातबाऱ्यावर पीक कर्ज देणाऱ्या बँकेशिवाय इतर संस्थेचा बोजा नसला पाहिजे, असा नवीन नियम व अट लागू केल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बँकांचे उंबरठे झिजवून ही पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जुने कर्ज भरून नवीन वाढीव कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे. नवीन वाढीव कर्ज घेताना सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असणे गरजेचे आहे. एकाच संस्थेक डून कर्ज घेणाऱ्या शेतक ऱ्यांना बँकेच्या नियमानुसार इतर शेती कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे शरद रोडगे (शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, सिल्लोड) यांनी सांगितले.बँकांकडून बळीराजाला सापत्न वागणूकसोसायटीकडून शेतकऱ्यांना प्रतिएकर साडेसहा हजार रुपयांप्रमाणे कर्जाचे वाटप केलेले आहे. बँक ांकडून १३ ते १५ हजार रुपये प्रति एकरप्रमाणे पीक कर्ज दिले जात आहे. ग्रामीण भागामध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरडवाहू जमिनीचा भाव प्रति एकर ५ ते ७ लाख, तर बागायत ८ ते १२ लाख रुपयांचा आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांकडून नवीन नियम व अटी लागू करून वेठीस धरले जात आहे. शहरातील व्यापाऱ्यांना मात्र व्यवसायासाठी बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलानुसार कर्ज दिले जाते. पीक कर्जाव्यतिरिक्त इतर शेती कर्जासाठी बँका शेतकऱ्यांशी मात्र दुजाभाव क रीत आहेत.ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर, ठिबक यासाठी बँकेकडून ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे एकाच संस्थेचे कर्ज असणे आवश्यक आहे. बँकांकडून पीक व इतर कर्जासाठी शेतकऱ्यांनी एकाच संस्थेकडून कर्ज घ्यावे, जेणेकरून कर्ज देताना बँकेला अडचण निर्माण होणार नाही -जी.एस.खवसे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद
पीक कर्जासाठी शेतकरी मेटाकुटीला
By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST