लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शेतकऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच होता. तालखेड, मोरेवाडी, साक्षाळ पिंप्री, उमापूर, रोहितळ, रामपुरी, धनेगाव, माजलगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. बीड, घाटनांदूरमध्ये आठवडी बाजार भरविण्यात आला. परंतु अल्प प्रतिसाद मिळाला. सोमवारच्या महाराष्ट्र बंदलाही अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.बीड, उमापूर, रामपुरी, मोरेवाडी, साक्षाळपिंपरी, रोहितळ, घाटनांदूर व तालखेडमध्ये प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो. बीडमध्येही रविवारी सकाळपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात शेतकरी, व्यापारी बाजारात येण्यास सुरूवात झाली. शेतकरी संप सुरू असताना हा बाजार कसा भरला? याबाबत काही शेतकऱ्यांशी चर्चा केली असता, संप बंद झाला आहे, म्हणून आम्ही बाजारात सहभागी झाल्याचे उत्तर ऐकावयास मिळाले. शनिवारपासून सोशल मीडियावर संप मागे घेतल्याच्या काही पोस्ट पडल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून बीडमध्ये आठवडी बाजार भरल्याची चर्चा होती. परंतु गर्दी नसल्याने शुकशुकाट दिसून येत होता. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये भाजी व जनावरांचा बाजार भरला. परंतु गर्दी नव्हती.तालखेड, मोरेवाडी, साक्षाळ पिंप्री, उमापूर, रोहितळ, रामपूरी, धनेगाव, माजलगाव येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. येथील व्यापारी, शेतकऱ्यांनी बाजार बंद ठेवून संपात सहभाग नोंदविला. धारूरमध्ये आज आंदोलनशेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी धारूर शहरामध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी भरणारा बाजारही बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.एसएफआयचा पाठिंबाशेतकरी आंदोलानाला स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेऊ नये, असे राज्याध्यक्ष मोहन जाधव यांनी सांगितले आहे. तालखेड फाट्यावर सोमवारी दुपारी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे जाधव म्हणालेशाहू महाराज प्रतिष्ठानचा सहभागस्वामीनाथन आयोग लागू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नये, असे आवाहन शाहू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकावर अध्यक्ष संगमेश्वर आंधळकर, योगेश बारसकर, विनोद मगर, महेश मगर, महेश खाडे, अमोल बोकन आदींची नावे आहेत.
चौथ्या दिवशीही शेतकरी संप सुरूच
By admin | Updated: June 5, 2017 00:22 IST