शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पाला आज निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:02 IST

अकरा दिवस भक्तिभावाने सेवा केल्यानंतर मंगळवारी (दि.५) मोठ्या उत्साहात गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरा दिवस भक्तिभावाने सेवा केल्यानंतर मंगळवारी (दि.५) मोठ्या उत्साहात गणेशभक्त लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा जयघोषात गणरायाला निरोप देण्यासाठी शहरात तीन भागातून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.यंदा गणाधिपतीचा १२ दिवस मुक्काम होता. सर्वजण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात एवढे रमून गेले होते की, दिवस कसे निघून गेले हे कोणाला कळलेच नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वजण जड अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप देणार आहेत. निरोप देण्यासाठी शहरवासीयांनी तयारी केली आहे. शहरात तीन ठिकाणी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर परिसरातून सकाळी ११ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, सर्व आमदार यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती होणार आहे. सर्वप्रथम संस्थान गणपतीच्या प्रतिमूर्तीची मिरवणूक निघेल. त्यानंतर गणेश महासंघ उत्सव समितीच्या मूर्तीची मिरवणूक निघणार आहे. यानंतर शहरातील विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील, अशी माहिती अध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली.नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघगजानन महाराज मंदिर परिसरातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या श्री विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यावेळी खा. चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची उपस्थिती राहील. मुख्य अतिथी म्हणून आ. सुभाष झांबड, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भगवान घडमोडे, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहेत. गणेशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष बाळूसेठ कुंकुलोळ जैन यांनी केले आहे.