शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यशचा खून करणाऱ्या आरोपीकडे कुटुंबीयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:02 IST

बी.एस्सी. ॲग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या राज जाधवने त्याचा मित्र यशचा शनिवारी रात्री मयूरपार्क येथे चाकूने भोसकून खून ...

बी.एस्सी. ॲग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या राज जाधवने त्याचा मित्र यशचा शनिवारी रात्री मयूरपार्क येथे चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी यशविरुद्ध हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी राज सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी राज जाधवचे वडील महसूल विभागात लिपिक आहेत. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे शिक्षण घेतो. राजला पोलिसांनी अटक केल्यानंतर आणि तो पोलीस कोठडीत असल्यावरही त्यांच्या एकाही नातेवाइकाने त्याची पोलिसांकडे विचारपूस केली नाही. ना कुणी हर्सूल पोलीस ठाण्याकडे फिरकले.

पश्चात्ताप झाल्याने रडू लागला

यशला चाकूने भोसकल्यावर मित्रांनी त्याला जळगाव रोडवरील खासगी रुग्णालयात नेले होते. तेथे बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांनी त्याला तेथून घाटीत हलविले होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आरोपी राज हा मृतासोबत असलेल्या मित्रांच्या संपर्कात होता. यशची तब्येत कशी आहे, वाचेल का तो, असे तो त्यांना विचारत होता. यशचा मृत्यू झाल्याचे समजताच, त्याने फोन बंद केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला लगेच पकडले. पोलीस कोठडीत असताना, त्याला आता यशच्या खुनाबद्दल पश्चात्ताप झाला आहे. आता तो रडत असल्याचे सूत्राने सांगितले. फौजदार मारुती खिल्लारे या घटनेचा तपास करीत आहेत.

चौकट

आरोपीकडून चाकू जप्त

यशचा खून करण्यासाठी वापरलेला धारदार चाकू पोलिसांनी रविवारी त्याच्याकडून जप्त केला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

चौकट

आरोपी राज होता शिक्षणासाठी कोकणात

राज वाईट मुलांच्या संगतीत अडकल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी त्याला दापोली येथे बी.एस्सी. ॲग्रिकल्चरल अभ्यासक्रमासाठी प्रवेशित केले. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे तो औरंगाबादला परतला होता.