शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाला आता चोवीस ऐवजी ४ लिटर रॉकेल !

By admin | Updated: March 18, 2016 01:54 IST

उस्मानाबाद : गॅसधारक नसणाऱ्या कुटुंबांना रॉकेल पुरवठा केले जाते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे परिमाण आहे. हे परिणाम शासनाकडून रद्द करण्यात आले आहे

उस्मानाबाद : गॅसधारक नसणाऱ्या कुटुंबांना रॉकेल पुरवठा केले जाते. शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे परिमाण आहे. हे परिणाम शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार आता शहरी तसेच ग्रामीण भागातील कुटुंबाला प्रत्येकी ४ लिटर एवढेच रॉकेल मिळणार आहे. पूर्वी शहरासाठी प्रति प्रतिकुटुंब २४ तर ग्रामीण भागासाठी प्रतिकुटुंब १५ लिटर एवढे परिमाण मंजूर होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाकरिता शासनाने १९९७ वितरण परिमाण निश्चित केले आहे. सदरील परिमाणामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांवर अन्याय होत अल्याचे सांगत या दोन्ही भागासाठी समान परिमाण निश्चित करण्यात यावे, अशा अशयाची याचिका आदर्श बाल विकास महिला मंडळाने नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. त्यावर न्यायालयाने केरोसीनचे समान वाटप करण्याबाबत पुनर्विचार करावा, असे आदेश शासनाला दिले होते. त्यानुसार २००१ मध्ये शहरी तसेच ग्रामीण भागासाठी एकच परिणाम जाहीर करून अंमलबजावणी केली. या परिणामास विरोध झाल्यानंतर पुन्हा २००१ पूर्वीच्याच परिमाणानुसार वाटप सुरू केले. या परिमाणाविरूद्ध नागपूर खंडपीठात पुन्हा जनहित याचिका दाखल झाली. त्यावर न्यायालयाने केरोसीन वाटपाचे सुधारित धोरण करण्याबाबद आदेशित केले होते. त्यानुसार शासनाकडून जुलै २०१५ मध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी एकसमान परिमाण जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणीही येत्या काही महिन्यात सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शिधापरित्रकेवर व्यक्तींची संख्या एक एवढी असेल तर २ लिटर, दोन व्यक्ती असतील तर ३ लिटर आणि तीन वा त्याहून अधिक व्यक्ती असल्यास ४ लिटर रॉकेल मिळणार आहे. जुन्या केरोसीन वितरण परिमाणानुसार शहरासाठी २४ तर ग्रामीण भागातील कुटुंबासाठी १५ लिटर रॉकेल मंजूर होते. (प्रतिनिधी)