शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावणेपाचशे कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा !

By admin | Updated: April 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) राबविण्यात येते.

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत आठ पालिकांकडे मिळून ५२९ कुटुंबांनी प्रस्ताव दाखल केले असता जिल्हास्तरीय समितीने ४८२ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे सर्वाधिक ४०६ प्रस्ताव उस्मानाबाद शहरातील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उपरोक्त ४८२ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार आहे.सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पक्का निवारा उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ५२९ कुटुंबियांनी त्या-त्या पालिकेकडे प्रस्ताव दाखल केले होते. यामध्ये उस्मानाबाद पालिकेला ४२९, तुळजापूर १९, नळदुर्ग ६, उमरगा ३०, कळंब १६, भूम १, परंडा ४, तर मुरूम पालिकेकडे २४ प्रस्ताव प्राप्त होते. या सर्व प्राप्त प्रस्तावांची छाननी केली असता ४७ प्रस्ताव अपूर्ण असल्याचे समोर आले. यात उस्मानाबाद २३, उमरगा ८, कळंब ५, भूम १ आणि मुरूम शहरातील १० कुटुंबांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामुळे समितीने ४८२ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे उस्मानाबाद शहरातील सर्वाधिक ४०६ प्रस्ताव आहेत. त्यानंतर तुळजापूर १९, नळदुर्ग ६, उमरगा २२, कळंब ११, परंडा ४ आणि मुरूम शहरातील १४ प्रस्ताव आहेत. सदरील घरकुलांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याण निरीक्षक पी. एच. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)