शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रात अनवाणी राहण्याचे ‘फॅड’

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे.

अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे. युवक व युवती तसेच प्राथमिक शाळेतील बालकेही नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस पादत्राणाचा वापर करायचा नाही हे फॅडच जणु काही पसरल्याने शहरात अनवाणीपणे चालणाऱ्या युवक-युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगणकीकरण, विज्ञान,तंत्रज्ञान यांचा झपाट्याने होत असलेला प्रसार, भौतिक सुविधांची रेलचेल अशाही स्थितीत श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे वाढत असलेले महत्त्व नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने समोर आले आहे. योगेश्वरी देवीचे नवरात्र सुरू झाल्यानंतर घटस्थापनेपासूनच अनवाणी राहण्याचा संकल्प शहरातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी केला आहे. अनवाणी राहयचे हे फॅड यावर्षीच्या नवरात्रौ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. येथील शालेय विद्यार्थी मांगल्य मोरोपंत कुलकर्णी याच्याकडे याबाबत विचारणा केली असता मातीत अनवाणीपणे चालल्यास रक्ताभिसरण चांगले होते. अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विज्ञानाचा आधार त्याने सांगितला. मात्र, शाळेतील अनेक मुली योगेश्वरी देवीसाठी आपण अनवाणी फिरत असल्याचे त्या म्हणाल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. डी. एच. थोरात म्हणाले की, तंत्रशिक्षण घेणारे व विज्ञानाचे पदवीधर विद्यार्थीही अनवाणीपणे फिरत आहेत. या रूढी व अंधश्रद्धेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.अनवाणी फिरण्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा व जंतुसंसर्ग याचा मोठा त्रास काही दिवसानंतर सुरू होतो. असे सांगून समाजात प्रबोधन व उद्बोधन झाल्यासच या प्रथा दूर होतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पूर्वी शहरातील काही ज्येष्ठ मंडळी अथवा महिला या प्रथेचे पालन करीत असत.मात्र, आता ज्येष्ठांपेक्षा युवक-युवतींनीच या नवरात्रात हे फॅड फॅशन म्हणून रूढ केल्याने अनवाणीपणे चालणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. (वार्ताहर)