शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने सुरू न होण्याच्या स्थितीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:09 IST

काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.

स. सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गतवर्षी मराठवाड्यात पाऊसकाळ चांगला राहिला. त्यामुळे ऊस भरपूर आहे. मात्र, काणत्या न् कोणत्या कारणाने साखर कारखाने मात्र चालू होण्याच्या स्थितीत नाहीत. यंदाचा गळीत हंगाम आॅक्टोबरपासून सुरू होईल.औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, जळगाव, नंदूरबार या सहा जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांशी निगडित प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय औरंगाबादेत क्रांतीचौकात आहे. एन. व्ही. गायकवाड या प्रादेशिक सहसंचालक आहेत. या सहा जिल्ह्यांत गतवर्षी सतरा साखर कारखाने चालू होते. यावर्षी एवढे साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबद्दल थोडी साशंकताच आहे. साखर कारखान्यांची आर्थिक अडचण यामागील कारण असून, आणखी आर्थिक अडचणी वाढवून घेण्यापेक्षा कारखानाच बंद असलेला बरा, असे साखर कारखानदारांना वाटत असते. उसाचे गाळप करू शकू की नाही, कामगार- कर्मचाºयांचे वेतन देऊ शकू की नाही, असा घोर या कारखानदारांना लागलेला असतो.जयभवानी, वैद्यनाथ, सिद्धेश्वर, पैठण, गंगापूर येथील साखर कारखाने गतवर्षीही बंदच होते. यावर्षीही ते सुरू होण्याची शक्यता कमीच दिसते. बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र भरपूर असूनही त्या जिल्ह्यातले कारखाने बंदच राहण्याची शक्यता आहे.लोकमतशी बोलताना साखर सहसंचालक एन. व्ही. गायकवाड यांनी सांगितले की, माझ्या हद्दीतील सहा जिल्ह्यांमध्ये १ लाख ७ हजार ८८४ हेक्टर इतके एकूण लागवड क्षेत्र आहे. यंदा ६४ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल आणि ते मागच्या वर्षीपेक्षा जास्त राहील. गतवर्षी २२ लाख मेट्रिक टन एवढेच साखरेचे उत्पादन झाले. गतवर्षी ऊस कमी असूनही १७ साखर कारखाने चालू होते. यावर्षी ऊस भरपूर आहे. मात्र, कारखाने किती चालू होतील, हा औत्सुक्याचाच भाग आहे. या सहा जिल्ह्यांत आडसाली लागवड क्षेत्र ३९६६.४९ हेक्टर, पूर्व हंगामी क्षेत्र-३२०८८.१०, सुरू-४५५९४.९४, खोडवा- २६२३५.१२. गतवर्षी या सहा जिल्ह्यांतील कारखान्यांच्या साखरेचा उतारा दहा टक्क्यांच्या आतच राहिला. नोव्हेंबर महिन्यात गळीत हंगाम सुरूझाला होता. जळगाव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा गळीत हंगाम डिसेंबरमध्ये सुरू झाला होता.यावर्षी पावसाच्या लहरी कारभारामुळे ऊस क्षेत्रावर व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.