शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा

By admin | Updated: August 19, 2016 00:58 IST

जालना : नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा आहे. डॉक्टरांच्या रिक्त जागा तसेच औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे

जालना : नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या आरोग्य केंद्रांत सुविधांची वानवा आहे. डॉक्टरांच्या रिक्त जागा तसेच औषधींच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. पाणीवेस आरोग्य केंद्र वगळता इतर दोन केंद्राची अवस्था बिकट आहे.नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात पाणीवेस, नूतन वसाहत, बुऱ्हाणनगर येथे आरोग्य केंद्र चालविले जाते. या सर्वच रुग्णालयात आयर्न, कॅल्शिअम आदी औषधींचा तुटवडा आहे. पाणीवेस भागातील केंद्राची नवीन इमारत आहे. मात्र, नूतन वसाहत व बुऱ्हाणनगर येथील इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. येथे सुविधांचा अभाव आहे. डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने सर्वच केंद्रांत तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागते. डॉ. सानप या पाणीवेस येथील केंद्रात रुग्णसेवा देतात. त्यामुळे इतर ठिकाणी सेवा कोलमडत असल्याचे चित्र आहे. नागरिकांना अल्पदरात सुविधा मिळाव्यात म्हणून आरोग्य केंद्र चालविण्यात येते. मात्र आज रोजी तीनही दवाखान्यांमध्ये सुविधांची वानवा आहे. रिक्तपदांमुळे रुग्णांवर उपचार होणे जिकिरीचे झाले आहे. गरीब रुग्णांना आपल्या परिसरात स्वस्तदरात उपचार मिळावेत म्हणून नगर पालिकेचे आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावत होते. गत काही वर्षांपासून ही केंद्रे शोभेची वस्तू बनली आहेत. या केंद्रांत जिल्हा रुग्णालयाकडून वेळेत औषधी पुरवठा होत नाही. काही औषधी मुंबई येथून येतात. इतर औषधी उपलब्ध असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)