शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-बसची समोरासमोर टक्कर

By admin | Updated: May 14, 2017 00:43 IST

नळदुर्ग : ट्रक-बसची समोरासमोर धडक होऊन २५ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महार्गावरील शिरगापूर शिवारात शुक्रवारी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनळदुर्ग : ट्रक-बसची समोरासमोर धडक होऊन २५ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महार्गावरील शिरगापूर (ता. तुळजापूर) शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड (पुणे) आगाराची बस (क्र. एमएच-१४/बीटी-०५१२) ही शुक्रवारी सायंकाळी मुरूमकडे जात होती. महामार्गावरील बाभळगावच्या पुलाच्या पुढे नवीन रस्त्यावरून जुन्या रस्त्यावर वळण घेत असताना हैदराबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकची (क्र. टीएस-०५/व्हीए-२०८२) या बसला समोरून जोराची धडक बसली. या अपघातात बसचालक राधाकिसन विठ्ठल गुजर (वय ५०, रा. राखेवाडी, पुणे) यांचे निकामी झाले. तसेच वाहक प्रवीण चंद्रसेन सुरवसे (वय ४०), प्रवासी राम धमाजी राठोड, बेबाबाई वसंता राठोड, झिमाबाई राम राठोड, चंदाबाई किसन राठोड, किसन परशुराम राठोड, बाबू थावरू राठोड, राणुबाई बलभीम राठोड (सर्व रा. खुदावाडी, ता. तुळजापूर), प्रकाश सुधाकर साळुंके, दिलीप राम सुरवसे, गणेश दत्ता माने (सर्व रा. जळकोट, ता. तुळजापूर), अण्णाराव सिद्राम बिराजदार, महानंदा अण्णाराव बिराजदार (रा. उमरगा) यांच्यासह ट्रक चालक सईद यादगिरी (रा. तुळशीनगर, ता. नलगोंडा, तेलंगणा) हे जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. यातील राधाकिसन गुजर, राम राठोड, राणुबाई राठोड आणि गणेश माने यांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमधील इतरही प्रवासी किरकोळ जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वाहक प्रवीण सुरवसे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच सपोनि प्रल्हाद सूर्यवंशी, ईटकळ दूरक्षेत्रचे हेकॉ आर. जी. सातपुते, कॉन्स्टेबल डी. यु. उंबरे, एन. एच. वाघमोडे, महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पाच सहकारी घटनास्थळी धावले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.