परळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या २० जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यामुळे मतदानाला गालबोट लागले. कार्यकर्त्यांमधील हाणामारीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ समोरासमोर आले. त्यामुळे राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे पहावयास मिळाले.सकाळी ८ ते सायंकाळी ५ या दरम्यान ४५ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. भाजप-राष्ट्रवादीच्या पॅनलचे ४० उमेदवार आमनेसामने होते. ८ हजार ४०९ मतदारांपैकी ६ हजार ९२३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा एकूण टक्का ८२.३२ इतका नोंदविला गेला. सिरसाळा, धर्मापुरी, पांगरी, परळी, नाथ्रा येथे हक्क बजावण्यासाठी रांगा लागल्या होत्या.मुद्द्यावरून गुद्द्यावर...परळी येथील जि. प. कन्या शाळेच्या केंद्रावर मतदान सुरू होते. पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचे स्वतंत्र मंडप समोरासमोर उभारले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद मुंडे व भाजपचे संदीप लाहोटी यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. लाहोटी हे मतदानासाठी येणाऱ्या सभासदांच्या पाया पडत विनवणी करीत होते. त्याला मुंडे यांनी आक्षेप घेतल्यावरून ही ठिणगी पडल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघेही मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. मुंडे यांनी लाहोटी यांना मारहाण केली. लाहोटी यांच्या मदतीला पंकजा मुंडे यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता धावून आला. त्याने प्रत्युत्तरादाखल शरद मुंडे यांना मारहाण केली. त्यानंतर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी केंद्राकडे धाव घेतली. यावेळी केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रारी दाखल झाल्या नव्हत्या. कोणाचीही तक्रार आली नाही, असे शहर पोलिसांनी सांगितले. अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक मारूती कराडे हे परळीत तळ ठोकून होते. शहरातील बारीकसारीक हालचालींवर खुद्द रेड्डी यांचे लक्ष होते.४० जणांचे भवितव्य मतदानपेटीतकारखाना निवडणुकीत मातब्बर नेत्यांनी उडी घेतली. पालकमंत्री पंकजा मुंडे त्यांच्या भगिनी यशश्री मुंडे, फुलचंद कराड, नामदेवराव आघाव या मातब्बरांचा समावेश आहे. २० जागांसाठी ४० जणांनी नशीब आजमावले असून त्यांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले.कर्मचारी निलंबितवैद्यनाथ कारखान्याचा कर्मचारी सर्जेराव आपेट हा बुथ एजंट म्हणून काम करताना आढळला. काहींनी आक्षेप नोंदविल्यावर शहानिशा करून निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांनी त्याला निलंबित केले.मंगळवारी निकालकारखाना संचालक पदाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरूवात होणार आहे. (वार्ताहर)परळी येथील जि. प. कन्या शाळेच्या केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना झाल्यानंतर तेथे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे दाखल झाले. काही वेळात पालकमंत्री पंकजा मुंडेही तेथे पोहचल्या.४धनंजय मुंडे यांनी ‘ताई, तुम्ही तुमच्या गाडीत बसा’ असे म्हटले. त्यावर पंकजा मुंडे यांनी ‘कशामुळे गाडीत बसू ? आता खूप झाले. दादागिरी खपवून घेणार नाही’ असे उत्तर दिले.४बहीण-भाऊ आमनेसामने आल्यानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्ते व पोलिसांनी हस्तक्षेप केला.हाणामारी सुरू असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा केंद्रावर दाखल झाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.४दिसेल त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. त्यानंतर एकच पळापळ उडाली.४या गोंधळात काहींच्या चपला तुटल्या. काहीजण तर धावता धावता कोसळले.४सकाळी दहा वाजता या हाणामारीनंतर दुपारी मतदानाचा ओघ उन्हामुळे ओसरला होता. दुपारनंतर शांततेत प्रक्रिया पार पडली.नाथ्रा येथे एकाच वेळी दोन लालदिव्यांचा ताफापरळी शहरात झालेल्या राड्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी थेट नाथ्रा गाठले. पाठोपाठ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील मतदानासाठी गावात धडकले. पंकजा मुंडेंनी आई प्रज्ञा व बहीण अॅड. यशश्री यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. त्या केंद्रातून बाहेर पडत असतानाच तेथे धनंजय मुंडे दाखल झाले. तेथेही बहीण-भावाची नजरानजर झाली. मात्र, काहीच न बोलता दोघेही निघून गेले. दरम्यान, लाल दिव्यांच्या दोन ताफ्यांचा थाट नाथ्रावासियांना अनुभवयास मिळाला.
लाठीचार्जनंतर गोंधळ बहीण-भाऊ समोरासमोर
By admin | Updated: April 27, 2015 01:01 IST