परंडा : तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या परंडा विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. कालपर्यंत दोन हात करण्याच्या मूडमध्ये असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीत मनोमिलन झाले असून, भाजपाने ऐनवेळी मैदान सोडल्याने आता काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा चुरशीचा सामना रंगणार आहे.परंडा सोसायटी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ही निवडणूक चौरंगी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. परंतु २५ रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय आखाड्यातील चित्र पालटले. केंद्र आणि राज्याच्या सत्तेत असणाऱ्या भाजपा पुरस्कृत केलेल्या सर्व उमेदवारांनी अचानक अर्ज माघारी घेतले. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांशी समेट केला. त्यामुळे काँग्रेस पुरस्कृत तीन आणि राष्ट्रवादी पुरस्कृत आठ असे गणित जुळले आहे. या विरोधात शिवसेना पुरस्कृत पॅनलचे १३ जागेसाठी १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत आता दुरंगी होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा-शिवसेना पुरस्कृत पॅनल होता. सोसायटीवर या दोन्ही पक्षांची सत्ता होती. यावेळी मात्र शिवसेनेने स्वबळावर पॅनल मैदानात उतरविले आहे. भाजपानेही स्वबळावर या आखाड्यात उडी घेतली होती. मात्र ऐनवेळी सर्वच उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले. याबाबत भाजपा तालुकाअध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मोबाईल आऊट आॅफ रेंज होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या सोसायटीसाठी जोर लावल्याचे दिसून येत आहे. शिवसेना पुरस्कृत पॅनल माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जि.प. गटनेते दत्ता साळुंके, पं.स. उपसभापती मेघराज पाटील, तालुकाप्रमुख गौतम लटके जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल आ. राहुल मोटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवित आहे. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत भालेराव, धनंजय हांडे, वाजीद दखणी, राहुल बनसोडे, जाकीर सौदागर हे पॅनलची धुरा सांभाळत आहेत.४५ एप्रिल रोजी मतदान होईल.४१३ जागेसाठी ७३ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.४‘ब’ प्रवर्गात मोडणाऱ्या या सोसायटी निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघासाठी ८, महिला मतदारसंघातून २, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून १, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातून १, इतर मागासप्रवर्गातून १ असे १३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. २२७४ मतदार संबंधित उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. ४सोसायटीचे कार्यक्षेत्र परंडा, पाचपिंपळा, पिंपरखेड, कुंभेफळ, मुगाव, कात्राबाद, ब्रम्हगाव, जामगाव, पिंपळवाडी, चव्हाणवाडी, आवारपिंपरी, कौडगाव.
सोसायटी निवडणुकीत दुरंगी सामना
By admin | Updated: March 26, 2015 00:55 IST