शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

जळीतांच्या चेहऱ्यावर त्यांनी पाहिले नवे तेज

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

पंकज जैस्वाल , लातूर लोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते़ अशाच पध्दतीने डॉक्टरांच्या परीस स्पर्शाने उपेक्षीत जळीत रूग्णांची काया सोन्यासारखी उजळून निघाली़

पंकज जैस्वाल , लातूरलोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते़ अशाच पध्दतीने डॉक्टरांच्या परीस स्पर्शाने उपेक्षीत जळीत रूग्णांची काया सोन्यासारखी उजळून निघाली़ उपचारानंतर या ४० रूग्णांच्या चेहऱ्यावरील हास्य व नवे तेज पाहून लातूरच्या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांच्या कार्याचेही सार्थक झाल्याचे समाधान मिळाले़शनिवारी व रविवारी या दोन्ही सुट्टीच्या दिवशी तज्ञ डॉक्टरांनी सामूहिकरित्या आपला संपूर्ण वेळ जळीत रूग्णांचे शल्य दूर करण्यासाठी विना मोबदला देवून सामाजीक आरोग्याच्या यज्ञात आपली समीधा टाकली़ रुग्ण जळाल्यानंतर त्यांचे आखडलेले सांधे मोकळे करण्याची अवघड शस्त्रक्रिया या तज्ञांनी केली़ शारीरीक व्यंग दूर करीत अनेकांचे जळालेले अवयव दुरूस्त केले़ त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ़दिप्ती डोणगावकर, औरंगाबाद येथील प्रसिध्द प्लास्टीक सर्जन डॉ़अविनाश येळीकर, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ़श्रीकांत गोरे, डॉ़जी़एल़अनमोड, डॉ़अजीत जगताप, डॉ़सतिष देशपांडे, डॉग़णेश स्वामी, डॉ़गिरीष ठाकूर, डॉ़हाके पाटील यांच्यासह भूलतज्ञ, निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा ताफा अगदी सुट्टीच्या दिवशीही मोठ्या उत्साहाने मोफत शस्त्रक्रियांच्या कामी सहभागी झाला होता़शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रूग्णालय तसेच पुण्यश्लोक चॅरिटेबल ट्रस्ट गोरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते २९ जून या कालावधीत जळीत रूग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ त्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांनी पुढाकार घेतल्याचे डॉ़ श्रीकांत गोरे म्हणाले़ शनिवारी २२ तर रविवारी १८ जणांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या़ तसेच तिघांना पुढील उपचाराचा सल्ला दिला़ जीवनदायी योजनेचाही लाभ़़़़शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ या जळीत रूग्णांपैकी अनेकांना झाला असल्याची माहिती डॉ़आनंद बारगले यांनी दिली़यापूर्वी मुरूड, देवणी, कवठाळा, हेर, उस्मानाबाद येथे झालेल्या शिबीरातही अनेकांना जीवनदायी योजनेचा लाभ मिळाला आहे़गेल्या दोन महिन्यात ४०० गावे फिरून १०२ जळीत रूग्णांची तपासणी केल्यानंतर ४३ रूग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड केल्याची माहिती डॉ़श्रीकांत गोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली़