शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

‘दख्खनी’ मातीची मिजासच निराळी!

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही. उर्दू अदबच्या दुनियेत दख्खनी मातीचा उल्लेख नसेल तर उर्दू साहित्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असा सूर आज येथे आयोजित एका परिसंवादात मान्यवरांनी आळवला.आमखास मैदानावर सुरू असलेल्या ‘उर्दू किताब मेला’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये उर्दू साहित्य अकादमीतर्फे ‘मराठवाडा में उर्दू अदब, सिम्त व रफ्तार’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर दिल्ली विद्यापीठातील निवृत्त उर्दू विभागप्रमुख डॉ.अतीक-उल्ला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इरतेकाज अफजल, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संचालक डॉ. खाजा मोहंमद इकरामोद्दीन, शारेख नक्षबंदी यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. इरतेकाज अफजल यांनी मराठवाड्यातील उर्दू साहित्य, संस्कृतीचा धावता आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतरही या मातीमधील अनेक गावांमध्ये रेल्वे जात नाही. जिथे जाते तिथे थांबत नाही ही शोकांतिका असली तरी लेखकासाठी हा विषय आहे.मैं चरागों को रौषणी दुंगा, तुम हवाओं के कान भर देना...असे हलक्या फुलक्या साहित्यापासून वली दकनी, नुरूल हसनैन, शाह सिराज वली, काझी सलीम, अशा अनेक शायर मंडळींचे नाव घेता येईल. त्यांनी उर्दू साहित्याला दिलेले योगदान येणारी पिढी कधीच विसरू शकत नाही. दख्खनच्या कोणत्या प्रदेशात तुम्ही भर उन्हाळ्यात गेल्यावर एक प्रकारचा विशेष सन्नाटा पाहायला मिळतो, अनेक लेखकांनी यावरही भाष्य केलेले आहे.या मातीत शब्द ठासून भरले आहेत. येथील रस्ते, बाजार, वारा, सण प्रत्येक गोष्ट संस्कृतीतून झळकत असते. हा वारसा जपणे आपले कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीने साहित्य लिहिले नाही तर किमान वाचायला तरी हवे, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. इकरामोद्दीन यांनी उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे नमूद केले. आपल्याकडे काही प्रस्ताव असल्यास परिषदेकडे अवश्य पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. परिसंवादात असलम मिर्झा, डॉ. मसरत फिरदोस, डॉ. शरफून निहार, अशरफ जावेद, डॉ. काझी अख्तर सुलताना, डॉ. हमीद उल्ला खान, डॉ. रिजवाना शमीम, डॉ. कीर्ती मालिनी जावळे आदींनी शोधनिबंध सादर केले. सूत्रसंचालन नवीन जे. पी. सईद यांनी केले.