शहरं
Join us  
Trending Stories
1
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
4
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
5
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
6
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
7
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
8
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
9
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
10
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
11
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
12
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
13
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
14
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
15
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
16
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
17
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
18
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
19
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
20
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना

नरहरी महाराजांच्या जयंतीची लक्षवेधी मिरवणूक

By admin | Updated: August 13, 2016 00:05 IST

औरंगाबाद : सोनार समाजाचे आद्य दैवत संतश्रेष्ठ नरहरी महाराजांच्या ८२३ व्या जयंतीनिमित्त आज शहरातून एकच पण अत्यंत लक्षवेधी, शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली.

औरंगाबाद : सोनार समाजाचे आद्य दैवत संतश्रेष्ठ नरहरी महाराजांच्या ८२३ व्या जयंतीनिमित्त आज शहरातून एकच पण अत्यंत लक्षवेधी, शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. ‘एक गाव एक मिरवणूक’अंतर्गत यंदापासून ही प्रथा सुरू करण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व त्यांनी खेळलेल्या शिस्तबद्ध पावलीने मिरवणूक अधिकच रंगतदार होत गेली. गुलमंडीवर काठी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सुवर्णकार व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून आपला सहभाग या मिरवणुकीत दाखवला होता. पैठणगेटपासून दुपारी या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर भगवा फेटा होता. सर्व महिलांनी फेटे बांधून घेतले होते. पुरुष एकाच पांढऱ्या पोशाखात सहभागी झाले होते. तर महिलाही एकाच रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे ही मिरवणूक अत्यंत आकर्षक व देखणी ठरली. मिरवणूक सुरू होताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महापौर त्र्यंबक तुपे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, सचिन खैरे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. एका आकर्षक वाहनात संतश्रेष्ठ नरहरी महाराजांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी एका वाहनात संगीत पार्टी एकापेक्षा एक सरस भक्तिगीते गाऊन छान वातावरण निर्मिती करीत होती. त्यावर अनेक जण नृत्याचा ठेका धरीत होते. मिरवणूक गुलमंडीवर आली आणि जल्लोष वाढला. नरहरी भक्त नृत्यात रंगून गेले. महिला भगिनींनीही पावलीचा जोरात ठेका धरला. सिटीचौक येईपर्यंत हा जल्लोष सुरूच होता. जय नरहरी व सोनार तितुका मेळवावाचा गजर यावेळी निनादत राहिला. या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये हे की, सोनार समाजाच्या सर्व पोटजातीचे बंधू- भगिनी खांद्याला खांदा लावून चालत होते. सराफा, शहागंजमार्गे ही मिरवणूक संस्थान गणपती, राजाबाजार येथे आली. तेथे लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष भास्करराव टेहरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व नंतर महाप्रसादाने मिरवणुकीचा समारोप झाला. अखिल सुवर्णकार सोनार समाज संत नरहरी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास बुटे, उपाध्यक्ष श्रीधर डहाळे, सचिव नंदू चिंतामणी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शहाणे, कोषाध्यक्ष संजय देवगिरीकर, सल्लागार शशिकांत उदावंत, सुरेश टाक, भगवान शहाणे, अनिता शहाणे, सूर्यकांत वाघ, सुरेश डहाळे, बबनराव मांडोले, जयश्री बुटे, शोभा मुंडलिक, किशोर पडवळ, अनिता काटे, डॉ. शरदचंद्र वानखेडे, सोपानराव मुंडलिक, अशोक वारेगावकर, अनिल पिंप्रीकर, श्रीधर डहाळे, रेखा डहाळे, नंदू चिंतामणी, दिगंबरराव उदावंत, श्रीराम अंबिलवादे, उमेश क्षीरसागर, कमलाकर दहिवाळ, चंद्रकांत जोजारे, सोपान मुंडलिक, लक्ष्मीकांत मुंडलिक, सुधाकर टाक, सुधीर चिणके, सुहास बार्शीकर, सुभाष उदावंत, किशोर उदावंत, उमेश उदावंत, अनिल चिंतामणी, विजया बार्शीकर, शोभा टेहरे, श्रीराम अंबिलवादे, रमेश इंदोरकर, आशा सावखेडकर, सोमनाथ विखणकर, संजय शहाणे, प्रभाकर जोजारे, मंगेश जवळगावकर, श्रीकांत उदावंत, प्रमोद रोजेकर, बबन मांडवे, खंडू सातारकर आदींचा या मिरवणुकीत प्रमुख सहभाग होता.