लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस झाला असून, लातूर शहरात जवळपास अर्धातास पावसाने सोमवारी हजेरी लावली. परिणामी शहरातील कॉईलनगरसह इतर सखल भागात असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्यातील औसा तालुक्यात तीन वर्षात प्रथमच तावरजा नदी वाहत असल्याचे दिसून आले. चाकूर तालुक्यातील अष्टामोड, नळेगाव आणि घरणी परिसरातही पाऊस झाला आहे. शिरुर अनंतपाळसह थेरगाव, दापका, आरीमोड, जोगाळा, शिवपूर, हिप्पळगा, लक्कड जवळगा येथे चांगला दमदार पाऊस झाल्याची नोंद आहे. निलंगा, औराद शहाजानी, हलगरा, सावरी, तगरखेडा, अंबुलगा बु. उदगीर, लोहारा, देवणी येथही चांगला पाउस झाला आहे. (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By admin | Updated: September 15, 2015 00:22 IST