शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 00:52 IST

जालना : मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले.

जालना : ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर राहण्याच्या कारणावरून मंठा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.आर. चव्हाण आणि पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे यांना जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी निलंबित केले.तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात थांबून गावातील विविध कामे आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी नेमूण दिलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नसल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक गावांत थांबत नसलयाच्या तक्रारीही अनेक गावातील ग्रामस्थांनी केल्या होत्या. परिणामी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या आदेशाची पायपल्ली जिल्ह्यात होत आहे. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचकच राहिला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची २४ एप्रिल रोजी मंठा येथे टंचाई आराखड्यासाठी बैठक असल्याने संपूर्ण तालुक्यातील प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते.पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे बैठकीला हजर राहिले नसल्याचा ठपका ठेवत त्यांना २५ एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी सांगितले.दरम्यान ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित केले असले तरी या मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथील प्रकरणाला बनावट फेरफार व मृत्यूप्रकरणाची किनार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. (प्रतिनिधी)