शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 3, 2014 00:03 IST

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विशेष पीक संरक्षण मोहिमेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे़

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विशेष पीक संरक्षण मोहिमेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे़ या मोहीमेंतर्गत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू यांनी केले़ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने २ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या कार्यक्रमांतर्गत विशेष पीकसंरक्षण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ विस्तार शिक्षण संचालक डॉ़ बी़ बी़ भोसले, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ़ डी़एल़ जाधव, कृषी विकास अधिकारी बी़ एस़ कच्छवे, प्राचार्य डॉ़ डी़ एऩ गोखले, प्राचार्य डॉ़ विलास पाटील, प्राचार्या विशाला पटनम्, डॉ़ उदय घोडके, प्राचार्य डॉ़ रोहिदास, डॉ़ पी़ एऩ सत्वधर आदींची उपस्थिती होती़ कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू म्हणाले, शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाची गरज परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलत असते़ मराठवाड्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वी कमी पावसामुळे चिंतेत होते़ आता पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितल़े़ यावेळी प्रगतशील शेतकरी नरेश देशमुख, गिरीष पारधे, तालुका कृषी अधिकारी डी़ बी़ काळे, आत्माचे उपसंचालक अशोक काळे, डॉ़ एस़ जी़ जेठुरे यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक डॉ़ ए़ के़ गोरे यांनी केले़ सूत्रसंचालन उदय वाईकर यांनी केले़ कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)