शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..!

By admin | Updated: May 10, 2017 00:47 IST

जालना : विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे केले.जालना शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. राज्य शासनाने मनरेगाअंतर्गत स्वतंत्रपणे समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु केली आहे. या ११ कलमी कार्यक्रमातंर्गत मागेल त्याला शेततळे, वृक्षारोपण, जलयुक्त शिवार अभियान, सिंचन विहीर, शौचालये, शोषखड्डे, फळबागा, स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, सातबारा संगणकीकरण, ईपॉस मशिन व ईपीडीएस, कर्ज पुनर्गठण आदी वैयक्तिक लाभाचे उपक्रम हाती घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जालना येथील श्री वर्धमान स्थानकवासी श्रवक संघाच्या गुरु गणेश सभामंडपात मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम स्वरुपात राबवण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त पुरवठा वर्षा ठाकूर, उपायुक्त पुनर्वसन मनोहर हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. भापकर म्हणाले की, जालना जिल्हा देशपातळीवर बी-बियाणे उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून, सीड हब म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. स्टिल उत्पादनातही हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपणास आता मागे राहायचे नाही. काही कारणाने मराठवाडा प्रदेश मानवविकास निर्देशांकांत मागे आहे. आता या पुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वरोजगार, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात अधिकारी व पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचा मोलाचा वाटा महत्वाचा आहे. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. मनरेगाअंतर्गत मजुरांना काम देताना त्यांना मजूर म्हणून संबोधण्या ऐवजी लाभार्थी म्हणून त्यांचा या पुढे उल्लेख करावा.यावेळी एलसीडी प्रोजेक्टद्वारे ग्रामस्वच्छता अभियान, पुरवठा विभाग ईपॉस प्रणाली, जलयुक्त शिवार, या बाबतचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त चौधर, पुरवठा विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.