शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पैठण एमआयडीसीत स्फोट

By admin | Updated: May 24, 2016 01:20 IST

जायकवाडी : पैठण एमआयडीसीमध्ये केमिकल बनवणाऱ्या सेटलाईट फार्मा कंपनीमध्ये शॉर्टसर्कि टमुळे क्रॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला

जायकवाडी : पैठण एमआयडीसीमध्ये केमिकल बनवणाऱ्या सेटलाईट फार्मा कंपनीमध्ये शॉर्टसर्कि टमुळे क्रॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला. सोमवारी (दि.२३) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कंपनीत मयत कामगाराच्या नातेवाईक व या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पैठण एमआयडीसीमध्ये सेटलाईट फार्मा ही केमिकल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीत सोलनापूर (ता.पैठण) येथील बबन शंकरराव खराद (४८) हे मागील २० वर्षांपासून या कंपनीत काम करीत होते. आज सकाळी ८.३० वाजता बबन खराद हे कंपनीमध्ये कामावर आले. दुपारी २ वाजता जेवणाच्या सुट्टीमध्ये कॉम्प्रेसर मशीनवर काम करत असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे होऊन कंपनीसमोरील रस्त्यावर जाऊन पडले.घटनेची माहिती मिळताच बबन खराद यांच्या नातेवाईकांसह या परिसरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते ,नागरिकांनी कंपनीमध्ये गर्दी केली. त्यामुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता .पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र शिंदे यांनी ताबडतोब कंपनीमध्ये धाव घेऊन वातावरण शांत केले. या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून कामगारास नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. त्यानुसार व्यस्थापनाने नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर तेथून मृतदेह हलविण्यात आला. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सपोनि रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय मोरे, शरद पवार,जाकेर शेख,विठ्ठल एडके करीत आहेत. मृत बबन खराद यांच्या पश्चात मुलगा,दोन मुली,पत्नी ,आई,दोन भाऊ असा परिवार आहे.