शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीच्या कारखान्यात स्फोट : एक कामगार ठार; मालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:24 IST

सिल्लोड शहरातील नामांकित शिल्पकार सासमकर यांच्या मूर्तीच्या कारखान्यात एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाल्याने एक कामगार जागीच ठार झाला, तर शिल्पकार राजेंद्र सासमकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सिल्लोड शहरातील नामांकित शिल्पकार सासमकर यांच्या मूर्तीच्या कारखान्यात एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाल्याने एक कामगार जागीच ठार झाला, तर शिल्पकार राजेंद्र सासमकर गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. ही घटना दुपारी साडेतीन वाजता घडली.शहरातील बाजार समिती आवारात असलेल्या सासमकर आर्ट स्टुडीओत दुपारी मूर्ती रंगरंगोटीचे काम सुरु असताना अचानक एयर कॉम्प्रेशरचा स्फोट झाला. यात कामगार महादू कदम (१९, रा. कदमवाडी, सिल्लोड) हा जागीच ठार झाला. हा कारखाना पत्राच्या दुकानात थाटलेला असल्याने स्फोट होताच त्याआवाजाने परिसरातील व्यापारी, बाजार समिती परिसरातील कामगार, कर्मचाºयांनी धाव घेऊन राजेंद्र सासमकर यांना तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविले.महादू कदम याचा मृतदेह सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविला.सिल्लोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची नोंद घेतली.ओळख पटणेसुध्दा कठीणएयर कॉम्प्रेशर टँकचा स्फोट एवढा भीषण होता की, महादू हा मशीनजवळ असल्याने त्याच्या शरीराच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. त्याची ओळख पटणेसुध्दा कठीण झाले होते.मोठी दुर्घटना टळलीसासमकर आर्ट स्टुडिओ हा पत्र्याचा शेडमध्ये असून याच्या बाजूलाही पत्र्याचेच शेड आहे. त्यात भुसार व धान्याची दुकाने आहेत.स्फोट होऊन जर आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र या स्फोटाचा परिणाम आजूबाजूला न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.घरातील कमावता मुलगा गेलाया दुर्घटनेत मरण पावलेला महादू कदम हा घरातील मोठा मुलगा असल्याने परिवाराची जबाबदारी तोच सांभाळत होता. त्याचा एक छोटा भाऊ दहावीत असून त्याच्या तीन बहिणींचे लग्न झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून केवळ अर्धा एकर शेती आहे. ती शेती आई -वडील बघतात. घरातील कमवता मुलगा गेल्याने कदम परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.