शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृतीच्या बैठकीला तज्ज्ञांचा दुष्काळ

By admin | Updated: March 15, 2016 00:40 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत. जलजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याचे शासनाचे आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ३१ जलतज्ज्ञांच्या बैठकीसाठी बोटावर मोजण्याइतकेच सदस्य हजर राहिले. दुष्काळात तरी पाण्याबाबत सतर्कता आणावी, अशी अपेक्षा असताना महसूल प्रशासनासह सिंचन, पाटबंधारे विभागाला दुष्काळाचे काहीही देणे घेणे नसल्याचा प्रत्यय आला. शासनाच्या ११ फेबु्रवारीच्या आदेशामुळे फक्त कागदी घोडे नाचविण्यापुरताच बैठकीचा फार्स केला गेला. बैठकीच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे या कामात व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या दालनात दुपारी १२.३० वा. बैठक झाली. ती बैठक २० मिनिटांत गुंडाळण्यात आली. सिंचन, पाटबंधारे आणि जीवन प्राधिकरणासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि काही माध्यम प्रतिनिधींची त्या छोटेखानी बैठकीला हजेरी होती. मनपा, प्रगतिशील शेतकरी, जलतज्ज्ञ, जायकवाडी प्रकल्पाचे प्रतिनिधी त्या बैठकीकडे फिरकलेदेखील नाहीत. कुणालाही पाण्याच्या दुष्काळाबाबत काहीही आस्था राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह तब्बल दोन तास बैठकीची वाट पाहत होते. या काळात सभागृहातील सर्व ए.सी, बल्ब, फॅन सुरू होते. बैठक होणारच नव्हती, तर विजेचा अपव्यय थांबविण्याची तसदीदेखील कुणीही घेतली नाही. जिल्हा प्रशासनात कुणाचाही कुणावर धाक नसल्याचे हे उदाहरण आहे. उपजिल्हाधिकारी गावंडे म्हणाले, पैठणला जलजागृती सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी होईल. कलशपूजन व इतर कार्यक्रम तेथे होतील. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता एस.व्ही.खरात म्हणाले, अधिवेशनासाठी अधिकारी गेल्यामुळे बैठकीला कमी सदस्य हजर राहिले.