शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘नवीन संहितांवर प्रयोग करावेत’

By admin | Updated: November 16, 2014 00:01 IST

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो. या नवोदित कलाकारांच्या मेहनतीला राज्य नाट्यस्पर्धेसारख्या व्यासपीठावर नवीन संहितांचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी राज्य नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.तापडिया नाट्यमंदिरात आयोजित हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या प्रथम फेरीचा शुभारंभ सोहळा पार पडला. या नाट्यस्पर्धेची सुरुवात किरण लद्देलिखित ‘अघटित’ या दोन अंकी नाटकाने झाली. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. दिलीप घारे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत पाठक, भारत जगताप, गजानन कराड आदींची उपस्थिती होती.नवोदित लेखकांनी आपल्या समस्या, आपले प्रश्न लिखाणात आणावेत, त्याचे नाटकात रूपांतर करावे, असे केल्यास रसिकांचा प्रतिसाद वाढणार हे नक्की. या पद्धतीने नाटके सादर करीत गेल्यास या स्पर्धेची भूमी हीच खरी रंगभूमी आहे, असे मानले जाईल, असा विश्वासही डॉ. घारे यांनी यावेळी व्यक्त केला.महत्त्वाकांक्षी कलाकारांनी या स्पर्धेत उतरल्यास तसेच मार्गदर्शनयुक्त नाटकाचे प्रयोग सादर केल्यास हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा ही कलाकारांसाठी मोलाची व मानबिंदू ठरेल. तसेच नवोदित नाट्यलेखकांनी आपल्या लिखाणात सामाजिक पर्यावरण, सामाजिक परिस्थिती, मानसिकता यासारख्या विषयांचा समावेश केल्यास सादरीकरणात निश्चितच बदल घडून येईल व रसिकांचा नाटकाकडे असलेला ओढा वाढेल, असे मत अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले.