शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

योगसाधनेतून अबालवृद्धांनी घेतला आनंदी जीवनाचा अनुभव

By admin | Updated: June 22, 2015 00:20 IST

लातूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रविवारी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या वतीने योगसाधना कार्यक्रम घेण्यात आला़

लातूर : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रविवारी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या वतीने योगसाधना कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी विविध प्राणायाम करण्यात आले़ या योगसाधनेतून आनंदी व निरोगी जीवनाचा कानमंत्रच मिळाल्याचे दिसून आले़गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय : शहरातील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करण्यात आला़ यावेळी प्रार्थना, व्यायाम, सूर्यनमस्कार व योगासने झाली़ यावेळी लक्ष्मीरमण लाहोटी, मुरलीधर इन्नाणी, शैलेश लाहोटी, सूर्यप्रकाश धूत यांची उपस्थिती होती़ श्री केशवराज विद्यालय : शहरातील श्री केशवराज विद्यालयात योगदिनाचे उद्घाटन जगन्नाथ चिताडे वैशाली ढगे, नितीन शेटे, तुकाराम गोरे, राजाराम बिलोलीकर, मुख्याध्यापक संजय विभूते यांच्या हस्ते झाले़ यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली़ यावेळी किरण भावठाणकर, संतोष देशमुख, दिलीप चव्हाण आदी उपस्थित होते़ मुरुड : येथे रविवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला़ आदीनाथ मंगल कार्यालय, प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित शिबीरास स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, मुरुड योग समितीचे पदाधिकारी, डॉक्टर असोसिएशन, रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ वेताळेश्वर शिक्षण संस्था : औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेअंतर्गतच्या राजीव गांधी इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्निक आणि लातूर कॉलेज फार्मसीच्या वतीेने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला़ यावेळी प्रा़ बीक़े़वाडीवाले यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी प्राचार्य संतोष मेतगे, प्राचार्य श्रीराम पेटकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते़ विश्वेश्वर संकुल : आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळांतर्गतच्या शिवलिंगेश्वर कॉलेज आॅफ फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदवीका महाविद्यालय, दगडोजीराव देशमुख डीफार्मसी कॉलेज, शिवलिंगेश्वर कॉलेज आॅफ फार्मसी, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूल, ब्ल्यू बर्ड सायन्स कॉलेजच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करण्यात आला़ यावेळी योगगुरू शिवरूद्राप्पा धाराशिवे यांनी मार्गदर्शन केले़ शिबीरास शिवचरण धाराशिवे, प्रभाकर कापसे, बसवेश्वर धाराशिवे, प्राचार्य डॉ़ एस़एऩनागोबा, प्रशांत धाराशिवे, विश्वेश्वर धाराशिवे, प्राचार्या फिरदोस देशमुख, दिनेश गुजराथी, समीर शफी, गोपाळ दंडिमे, महेश मुगावे, एस़एस़वागदरे, गणेश गोसावी, विद्या कापसे, प्रतिभा थावरे, ज्योती आरसुडे, प्रा़ अंकुश बिडवे, राख आदी उपस्थित होते़लामजना शाळा : लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योगदीन साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापक आऱजी़पाटू, लाडखाँ सय्यद, सरपंच मंगल कांबळे, बालाजी शिंदे, बाजीद बिरादार, श्रीकांत शिंदे, उत्तम कांबळे, संजय शिंदे, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते़ श्री कुमारस्वामी महाविद्यालय : औशातील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला़ यावेळी तहसीलदार डी़एऩभारस्कर, खलील शेख, लेफ्टनंट आऱजी़महावरकर, हवालदार अण्णाराव वाघमारे, बी़व्ही़घोगरे, प्राचार्य डॉ़ एम़एऩबेटकर, बी़एच़महाजन, प्रा़ जी़पी़मनगिरे आदी उपस्थित होते़ देवणीत योग शिबीर : देवणी येथील विवेकवर्धिनी विद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित शिबीराचे उद्घाटन संस्थासचिव भगवान पाटील यांच्या हस्ते झाले़ याावेळी पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, नायब तहसीलदार घोंगडे, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी गायकवाड, विस्तार अधिकारी शिवदास स्वामी, गोरख मोरे, रमेश जाधव, प्राचार्य जी़एऩसगर, प्राचार्य डॉ़ रामरतन शिंदे, ज्ञानेश्वर देवणे, नष्टे, बुद्धे, सौंदळे, पोतदार, पाटील, पांडुरंग कदम, विश्वास मोदी, शंकर जीवणे, वसंत मोदी, शिवाजी कांबळे, पडसलगे आदी उपस्थित होते़ तसेच विठ्ठल रूक्मिणी मंदिरात बसवराज पाटील यांच्या वतीने महिलांसाठी योग शिबीर घेण्यात आले़ यावेळी मनोहर पटणे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती़ पोलिस ठाणे : देवणी पोलिस ठाण्यात योग शिबीर घेण्यात आले़ यावेळी पोलिस निरीक्षक व्ही़एमक़ेंद्रे, पोलिस उपनिरीक्षक बसवंते, महेंद्रसिंह ठाकूर, उद्धव मल्लेशे, सौंदळे, सुरेश कोतवाल यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती़ वलांडी येथील सौ़ अनुसयादेवी सोनकवडे विद्यालय, व्यंकटेश विद्यालय, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, धनेगाव येथील श्री महादेव विद्यालय, कवठाळा येथील शिवाजी विद्यालय, जवळगा येथील जिल्हा परिषद प्राशाला, सौ़ मीरा विद्यालय, हेळंब येथील नागाबुआ विद्यालय, चवणहिप्परगा येथील नरसिंह विद्यालय, दवणहिप्परगा येथील विमलताई विद्यालय, भोगेश्वर विद्यालयात योग शिबीर घेण्यात आले़ दरेवाडीतील बालाजी मंदिरात आनंद पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शिबीरात सुभाष मोरे यांनी योगासंदर्भात माहिती दिली़ बीएसएफ प्रशिक्षण केंद्र : चाकुरातील सीमा सुरक्षा प्रशिक्षण उपकेंद्रात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला़ उद्घाटन बी़एस़एफ़चे महानिरीक्षक आऱसी़ध्यानी यांच्या हस्ते झाले़ यावेळी संजय शर्मा, विशाल राणे, बुद्धादेव रॉय, रितेश बावणेर, बी़एम़ संदीप, समशेरसिंह यांच्यासह सातेश जवान आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदविला होता़ जगत् जागृती विद्यामंदिर : चाकुरातील जगत् जागृती विद्यामंदिरात एनसीसीच्या वतीने योगदिन साजरा करण्यात आला़ यावेळी नायब तहसीलदार बनसोडे, सहाय्यक गटविकास अधिकारी ए़ए़शेख, एनसीसीचे माधवराव गिते, मुख्याध्यापक सुभाष नागरगोजे, वामनराव सूर्यवंशी, संजय नारागुडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते़ शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील ७४ शाळेतील १५ हजार विद्यार्थ्यांनी जागतिक योगदिनात सहभाग नोंदविला होता़ साकोळ, दैठणा, बाकली, शिरूर अनंतपाळ येथे पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ बाकली जिल्हा परिषद शाळेत विठ्ठलराव पाटील यांच्या उपस्थितीत योग शिबीर झाले़ यावेळी शिवराम महाराज, धोंडीराम कारभारी, जीवन बसपूरे, गटविकास अधिकारी मुक्कावार, पंचगल्ले यांची उपस्थिती होती़ भालकी : बीदर येथील बरिदशाही गार्डनमध्ये छात्रसेना कॅडेट्स्नी जागतिक योगदिन साजरा केला़ बीदर थ्री ईअर फोर्स व बीदर, भालकी, हुमनाबाद येथील एनसीसी छात्रच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी वायुदलाचे वींग कमांडर सी़आऱरेड्डी यांनी योगासंदर्भात मार्गदर्शन केले़ कार्यक्रमास पुरातत्व विभागचे प्रमुख जे़ रंगनाथ, कॅप्टन राजेंद्र बिरादार, कॅप्टन नीळकंठ काळे, विठ्ठल रेड्डी, मोहम्मद रफी, ओमकार पाटील आदी उपस्थित होते़