शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंचेवीस लाख खर्च; इमारत धुळखात !

By admin | Updated: August 9, 2014 00:34 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करुन टोलेजंग इमारत उभी केली आहे

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करुन टोलेजंग इमारत उभी केली आहे. मात्र हे काम पूर्ण होवून पाच महिन्याचा कालावधी लोटला असतानाही केवळ लाईट फिटींग अभावी ही इमारत धुळखात पडून आहे.पारगावसह परिसरातील शेतकरी शेतीचा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे पशुधन संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.या दवाखान्यांतर्गत पारगाव, जानकापूर, रुई, लोणखस, हातोला, आनंदनगर, पवार वस्ती, हिंगणी (खुर्द), हिंगणी (बु.) आदी गावे येतात. दवाखान्यात येणाऱ्या पशुधनांची संख्या लक्षात घेता, सुविधांची वानवा होती. तसेच इमारतही जुनाट झाली होती. डॉक्टरांना वास्तव्यासाठी निवासस्थाने नव्हती. दरम्यान, या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा परिषदेने येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी २५ लाखाचा निधी मंजूर केला होता. या माध्यमातून टोलेजंग इमारत उभारण्यात आली आहे. हे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. मात्र लाईट फिटींग झाली नसल्यामुळे सदरील इमारत धूळखात पडून आहे. याबाबत अभियंता के.बी. फाळके म्हणाले की, दवाखान्याची इमारत मुदतीत पूर्ण करण्यात आली आहे. लाईट फिटींगचे काम अपूर्ण आहे. यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. (वार्ताहर)