बाळासाहेब जाधव , लातूरयावर्षी पुरेसा पाऊस झाला नाही़ पुनर्वसू नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्याने एकूण क्षेत्रापेक्षा तीप्पट क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली़ परंतु पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बॅगचे सोयाबीन उगवले नाही़ याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करताच कृषी विभागाच्या वतीने पंचनामे केले़ परंतु हातचे सोयाबीन गेलेल्या शेतकऱ्याला आता मदतीची अपेक्षा लागली आहे़लातूर जिल्ह्यात इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे व कमी पाऊस झाल्यामुळे एकूण क्षेत्रापेक्षा तीप्पट क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली़ त्यातील काही ठिकाणचे सोयाबीन उगवले नाही़ तर काही ठिकाणी बॅगचे सोयाबीन पेरली तरी बोगस बियाण्यामुळे २१९७ शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन उगवले नाही़ परिणामी शेतकऱ्यांच्या २५ कंपन्याच्या बियाण्याविषयी तक्रारी आल्यामुळे कृषी विभागाच्या वतीने न उगवलेल्या सोयाबीनचे पंचनामे केले़ एकूण क्षेत्रापैकी सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पंचनाम्यासंबंधीचा अहवाल संबंधित कंपन्यांकडे पाठविण्याचे काम कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले़पंचनामे करताना संबंधित कंपनीचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांनी केलेल्या पंचनाम्याचा अहवाल कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे़ परंतु शेतकऱ्यांच्या सोयाबीन नुकसान भरपाईबाबत कंपनीचा अद्याप निर्णय झालेला नाही़ त्यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत़
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
By admin | Updated: August 20, 2014 01:52 IST