शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अपेक्षा उंचावल्या...

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे.

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे. जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतर जिल्ह्याला हे स्थान मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दानवे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. चार दशकांच्या राजकीय वाटचालीतील २४ पैकी २३ निवडणुका जिंकत आपले वर्चस्व कायम राखणार्‍या खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी २ लाखांवर मताधिक्याने विजयश्री पटकावली. मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले. १९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. या व्यतिरिक्त रामेश्वर सहकारी साखर कारखाना, पंचायत राज समितीचे राज्याध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. खा. दानवे यांच्या राजकीय आयुष्यातील १९८५ सालची विधानसभा निवडणूक अपवाद त्यांनी पराभव पत्करला नाही. खा. दानवे हे एक प्रदीर्घ अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. जालना-खामगाव व सोलापूर जळगाव लोहमार्गाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी गॅसलाईन, बदनापूरजवळ रेल्वेचा मालधक्का, जालना ते औरंगाबाद दुहेरी लोहमार्ग इत्यादी प्रश्न सुटावेत, अशीही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या मदतीने विविध विकास कामे करावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्टील, बियाणे या उद्योगांमुळे जालना जिल्ह्याचे नाव देशभर पसरलेले असले तरी उद्योग वाढीसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज असल्याचे उद्योजकांमधून सांगण्यात आले.(प्रतिनिधी) मिळालेल्या संधीचे सोने करू केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य व देशात चांगले काम करण्याची आपणास संधी दिल्याने या संधीचे आपण सोने करू, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या रूपाने जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्राच्या सत्तेत संधी मिळाली आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.