शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन कोटीतून ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण

By admin | Updated: August 11, 2014 01:52 IST

औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या.

औसा : औशापासून लातूरचे अंतर कमी असल्यामुळे औसा शहरात अद्ययावत सुविधा असणाऱ्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. आमदार बसवराज पाटील यांच्या प्रयत्नातून तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च करून औसा, किल्लारी आणि कासारशिरसी या तीन ग्रामीण रुग्णालयांचे विस्तारीकरण करण्यात आले. आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठीही जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या औसा तालुक्यातील रुग्णांना आता अद्ययावत आरोग्य सुविधा मिळणार आहेत़औसा मतदारसंघातील औसा, किल्लारी आणि कासारशिरसी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तर औसा तालुक्यात सात ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. औसा आणि किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञांची संख्या कमी असल्याने गंभीर आजारी रुग्णांना लातूरला पाठविण्यात येत होते. पण आता या ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे़ लवकरच श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औसा आणि किल्लारी या दोन्ही ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी १ कोटी २२ लाख रुपये खर्चून विस्तारीकरण करण्यात आले आहे तर कासारशिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात १ कोटी ३५ लाखांची विविध कामे करण्यात आली. औसा येथील नागरी दवाखान्याचे स्थलांतर आलमला येथे करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. रामलिंग मुदगड येथेही प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाली आहे. बेलकुंडच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी ३० लाख ७० हजार, हासेगावला ४५ लाख ५० हजार, जवळगा (पोमादेवी) ला ३२ लाख २५ हजार, लामजना येथे ५६ लाख ५१ हजार, मातोळा येथे २८ लाख ३१ हजार, उजनी येथे ३३ लाख ३६ हजार असा खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र बळकटीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. रुग्णालयांच्या विस्तारीकरणामुळे सामान्य रुग्णांना मोठा लाभ होणार आहे़आमदार बसवराज पाटील म्हणाले की, आज शहरी भागात मोठ-मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार घेणे आवाक्याबाहेर आहे. मोठ्या व खाजगी रुग्णालयात जसे उपचार मिळतात, तसे उपचार शासकीय रुग्णालयात मिळावेत म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवाही महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.