शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नवप्रकाश योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: June 24, 2017 23:40 IST

परभणी : वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरु असलेल्या नवप्रकाश योजनेला ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.महावितरणच्या वतीने जिल्ह्यातील ग्राहकांना १० उपविभागांतर्गत वीजपुरवठा केला जातो. ग्राहकांना विजेपोटी दर महिन्याला वीजबिल दिले जाते. परंतु, जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून बिलाचा वेळेवर न भरणा करणाऱ्या ग्राहकांची वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर जवळपास ५०० कोटीपर्यंत गेला आहे. त्यामुळे हा थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी १ नोव्हेंबर २०१६ पासून नवप्रकाश योजना राबविण्यात आली. या योजनेचा कालावधी संपल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे महावितरणने पुन्हा या योजनेला आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, री कनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सुट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञा पत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास ७८ हजार ग्राहक येतात. या ग्राहकांकडे ९६ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे.त्यामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.