शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: January 2, 2015 00:51 IST

औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.

औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे. शासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांचे वीज बिल माफ केलेले आहे.कृषी संजीवनी योजना २०१४ अंतर्गत शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या कृषिपंपाच्या एकूण मूळ थकबाकी बिलापैकी ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास बाकी ५० टक्के मूळ रक्कम शासन महावितरणकडे जमा करते. ३१ मार्च २०१४ पर्यंतचे कृषिपंपाचे व्याज आणि दंड महावितरण ग्राहकांला माफ करते. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के फायदा मिळतो. योजनेला शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महावितरणने कळविले आहे. महावितरणचे औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांच्या बिलापोटी शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपये थकले आहेत. झोनमध्ये कृषिपंपांची संख्या ३०७२१५ आहे. या कृषिपंपधारकांकडे १ हजार ४५४ कोटी ४९ लाख ३१ हजार वीज बिल थकले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २०२४३६ कृषिपंंपधारकांकडे ८३१२९.८६ लाख रुपये थकले आहेत. जालना जिल्ह्यात १०४७७९ कृषिपंपधारकांकडे ६२३१९.४५ लाख रुपये थकले आहेत. योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला नसल्यामुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.