जालना : आरोग्याचे आपल्या निरोगी जीवनात महत्वाचे स्थान असून नियमित व्यायाम व प्राणायाम करणे आवश्यक आहे. अनियमित जीवनशैली आजारांचे मुळ कारण असून सर्वांनी आरोग्याबाबत जागृत राहून आपले ध्येय साकार करावे, असे प्रतिपादन योगगुरू मनोज लोणकर यांनी युवा शक्ती जागरण आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान करतांना केले. यावेळी विविध योगाचे प्रात्यक्षिक तसेच निरोगी जीवनासाठी काय केले पाहिजे याची उदाहरणासह उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनेकांच्या प्रश्नांचेही यावेळी लोणकर यांनी निरसन केले.येथील मत्स्योदरी महाविद्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संस्कार दिन समितीच्यावतीने आयोजित ‘स्वामी विवेकानंद जन्मदिवस - युवा सप्ताह’ कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य रामराजे लाखे तर जिल्हा क्रीडा अधिकारी भीमराव तुरूकमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.राजकुमार बुलबुले यांनी केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. संजय शेळके, प्रा.हनुमंत गोपछडे, प्रा.रमेश भुतेकर, प्रा.पांडुरंग खोजे, प्रा.डॉ.सुरेश गरूड, प्रा.दत्ता पटाईत, प्रा.शौकत शेख, प्रा.रविराज कटारे, प्रा.गौतम उघडे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा - लोणकर
By admin | Updated: January 30, 2016 00:19 IST