लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५६५ केंद्रावरून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. सदर परीक्षा शेवटची घेण्यात आली असून ५ हजार निरक्षरांपैकी ४६०० जणांनी परीक्षा दिली. उर्वरीत परीक्षार्थींची आकडेवारी जुळवणी सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी दिली.राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (नोयडा) मार्फत साक्षर भारत मिशनतंर्गत जिल्ह्यातील ५६५ ग्राम लोक शिक्षण समिती असलेल्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये खरेच किती नवसाक्षर साक्षर झाले आहेत, याचा आढावा शिक्षण विभागातील वरिष्ठ समितीतर्फे घेतला जाणार आहे. उपक्रम सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत जवळपास १ लाखांवर निरक्षर साक्षर झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे होती. उर्वरित नवसाक्षरांची परीक्षा रविवारी झाली. जिल्ह्यात एकूण ११३० प्रेरक साक्षर भारतसाठी नेमण्यात आले होते. २० आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांना संचालक अधिकारी, प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी भेटी दिल्या.कौठा केंद्रास भेटकौठा : येथे साक्षर भारत परीक्षेस शिक्षणाधिकारी डी .आर. चवने सातपुते, शेकडे यांनी भेट दिली. सदर परीक्षा सुरळीत पार पडली असून केंद्रावर मुख्याध्यापक सदावर्ते, प्रेरिका ज्योत्स्ना स्वामी, पाईकराव, शाळा समितीचे अध्यक्ष बोबडे आदी उपस्थित होते.परीक्षा सुरळीतकनेरगागाव नाका : साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत आज दि २०आॅगस्ट रोजी फाळेगाव केंद्रा अंतर्गत फाळेगाव, कानडखेडा बु., देवठाणा कानडखेडा खु., कनेरगाव नाका, वांझोळा आदी गावांतील नवसाक्षरांनी परीक्षा दिली. सदर परीक्षा सुरळीत पार पडली.परीक्षार्थींचे इंग्रजीतून नावेपोत्रा : मराठीतूनच बरोबर लिहिता येत नाही, निरक्षर नवसाक्षरांची २० आॅगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्न उत्तर पत्रीकेत परीक्षार्थींचे नाव चक्क इंग्रजीतून टाकून देण्यात आले. त्यामुळे या अजब कारभारावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.२० आॅगस्ट रोजी कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेवर नवसाक्षरांसाठी प्राथमिक साक्षरता परीक्षा घेण्यात आली. नवसाक्षर परीक्षेचे पेपर गिरवत असताना एक बाब निदर्शनास आली की, प्रश्नोत्तर पत्रिकेत परीक्षार्थीचे नाव प्रथम आडनाव टाकून इंग्रजीमधूनच नावे टाकण्याची सूचना निदर्शनास आली. सदर प्रश्नोत्तर पत्रिकेवरील नावे ही प्रेरकांनीच इंग्रजीतून टाकल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात नवसाक्षरांची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:14 IST