शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा संचालकांनी दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:39 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी शुक्रवारी सायंकाळी कर्मचा-यांमार्फत पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी शुक्रवारी सायंकाळी कर्मचा-यांमार्फत पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे सुपूर्द केला. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात दिले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हा राजीनामा रात्री उशिरापर्यंत स्वीकारला नव्हता. मात्र डॉ. दांडगे शनिवारपासून कामकाज पाहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी परीक्षा विभागातील एका अधिकाºयाच्या मनमानीपणाला कंटाळून कुलगुरूंकडे गुरुवारी सकाळी अडचणी मांडल्या होत्या.या अडचणी सोडविल्याशिवाय कामकाज पाहणार नाही, असेही स्पष्ट केले. याविषयी निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंना एक दिवसाचा अवधी दिला होता. यासाठी शुक्रवारी दिवसभर वाट पाहिली. मात्र कुलगुरूंनी कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कर्मचा-यांमार्फत डॉ. दांडगे यांनी राजीनाम्याचे पत्र कुलगुरूंकडे सुपूर्द केले. तेव्हा खडबडून जागे झालेल्या कुलगुरूंनी डॉ. दांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित अधिका-याला कार्यालयात बोलावले होते. तेव्हा दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र काहीही तोडगा निघाला नसल्याचे समजते. याविषयी डॉ. दांडगे, कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.परीक्षा संचालक डॉ. दांडगे यांनी राजीनामापत्रात वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.