शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षांसह सहा जणांना केले हद्दपार...

By admin | Updated: April 29, 2017 00:47 IST

उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़

उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़ यात दोघांना तब्बल दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़ तर इतरांना तीन ते सहा महिन्यांसाठी जिल्हा व परिसरातील तीन तालुक्यांमधून हद्दपार केले आहे़उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांसह इतर अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपितांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येतात़ सन २०१४ पासून उस्मानाबाद येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात दाखल असलेले ४५ प्रस्ताव प्रलंबीत होते़ उपविभागीय दंडाधिकारी म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षकांसमवेत बैठक घेतली होती़ या बैठकीत प्रस्तावित तडीपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या़ प्रस्तावांवरील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीसा देऊन बोलाविण्यात आले होते़ या सुनावणीदरम्यान उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांना उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़मागील काही वर्षात भिमनगर व सांजा रोड भागातील युवकांमध्ये सतत हाणारी होऊन शहराचे वातावरण बिघडाविले जात होते़ या दोन्ही टोळींमधील प्रमुखांसह इतर काहींचे हद्दपारीचे प्रस्तावही दाखल होते़ यातील सांजा रोड टोळीतील प्रमुखाला यापूर्वीच हद्दपार करण्यात आले आहे़ तर शुक्रवारी काढलेल्या आदेशात भिमनगर मधील लल्या उर्फ सुशांत बनसोडे, व भैय्यासाहेब नागटिळे या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील बीड, लातूर, सोलापूर आदी जिल्ह्यांमधून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़ याशिवाय सांजारोड टोळीतील सचिन नामदेव राठोड याला सहा महिन्यांसाठी, भिमनगर मधील बाळासाहेब अंगुल बनसोडे याला सहा महिन्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे़ तर शहरातीलच प्रकाश छगन पवार याला तीन महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे सांगून उर्वरित प्रकरणेही लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली़(प्रतिनिधी)