शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

प्रत्येकाने गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे

By admin | Updated: January 21, 2015 01:07 IST

जालना : जगात प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे, असा संदेश प.पु. विवेकमुनीजी म.सा. यांनी आपल्या आशीर्वादपर प्रवचनातून दिला.

जालना : जगात प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे, असा संदेश प.पु. विवेकमुनीजी म.सा. यांनी आपल्या आशीर्वादपर प्रवचनातून दिला.जैन समाजाचे आराध्य दैवत प.पु. गुरू गणेशलालजी म.सा. यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवात ते मार्गदर्शन करीत होते. गुरू गणेशलालजी म.सा. यांचे समाधीस्थळ असलेल्या येथील तपोधामवर दर्शनासाठी देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी आज दिवसभर गर्दी केली होती. यावेळी झालेल्या गुरू गुणगान सभेत महाराष्ट्र उपप्रवर्तक प.पु. श्रुतमुनीजी म.सा., मौनसाधक प.पु. सौरवमुनीजी म.सा., मधुरव्याख्यानी प.पु. गौरवमुनीजी म.सा., प.पु. नरेशमुनीजी म.सा., प्रखरवक्ता प.पु. सुशीलकंवरजी म.सा., प.पु. शालीभद्रजी म.सा., प.पु. जयश्रीजी म.सा. आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.विवेकमुनीजी पुढे म्हणाले, गुरूदेव यांच्यात ज्ञानाचा अहंकार कधीच नव्हता. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत गेले. दिवसेंदिवस या तपोधामवर वाढणारी भाविकांची संख्या हे त्याचेच द्योतक आहे. मनुष्याची अहंकारी प्रवृत्ती वाईट असते. ती माणसे जोडण्याऐवजी तोडण्याचेच काम करते. त्यामुळे मनुष्याने नेहमी अहंकारापासून दूर रहावे, असे आवाहनही विवेकमुनीजी यांनी केले. श्रुतमुनीजी म.सा. म्हणाले, गुरूविना जीवन नाही. जीवनात गुरू शिष्यांना दिव्यासारखे मार्ग दाखवतात. त्यामुळे गुरू साधकाला आवश्यक असतो. पु. गणेशलालजी म.सा. यांच्या पश्चात त्यांनी अनुभूती श्रावकाला होते, असे त्यांनी सांगितले. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा यांनी अध्यक्षीय समारोप करताना श्रावक संघामार्फत चालणाऱ्या विविध उपक्रमामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाने सहभाग घेतल्याने सर्वजण एकत्र जोडल्या गेले, असे सांगितले. यावेळी पुण्यतिथी महोत्सवासाठी विविध ठिकाणांहून पदयात्रेद्वारे आलेल्या १० पदयात्रा प्रमुखांचा संतमुनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकाश बोथरा (वैजापुर), परमेष्ठी गु्रप (औरंगाबाद), सुरेशचंद ललवाणी (जामनेर), अजित ओस्तवाल (सिल्लोड), जवाहरमल बोरा (बीड), कोमलचंद बेदमुथा (लोणार), सुदर्शन नहाटा (पारगाव) आदींचा समावेश होता. ‘अमृत का आस्वाद’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले. आ. सुभाष झांबड, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी आदींनी तपोधामवर समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी ज्ञानप्रकाश योजना जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजू दर्डा, उपाध्यक्षा रुचिरा सुराणा, डॉ. धमरचंद गादिया, स्वरुपचंद ललवाणी, कचरूलाल कुंकुलोळ, आनंदकुमार सुराणा, विजयराज सुराणा, भरतकुमार गादिया, संजय मुथा, डॉ. गौतमचंद रुणवाल, नरेंद्र लुणिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा आदींची उपस्थिती होती.आज दिवसभर गणेश भवन परिसरात भाविकांची गर्दी होती. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)