शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

अखेर युवक महोत्सवाला प्रमुख पाहुणे मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर करणार असून, समारोप समारंभाला अभिनेता संदीप पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाला अखेर प्रमुख पाहुणे मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर करणार असून, समारोप समारंभाला अभिनेता संदीप पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.युवक-युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा महोत्सव येत्या रविवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये युवक महोत्सवात सहभागी होणे अपेक्षित असते; परंतु आतापर्यंत केवळ २३० महाविद्यालयांनी नोंदणी केली असून सहभागी न होणा-या महाविद्यालयांना दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.महोत्सवातील सहभागी विद्यार्थ्यांना दरवर्षी ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. निवास आणि भोजनाची व्यवस्था सर्वात महत्त्वाची असते. अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या महोत्सवाची तयारी पूर्ण न झाल्याचे चित्र आहे.दरम्यान, दिवाळीच्या सुट्या आल्याने नियोजनकार्यात खंड पडला. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.