शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

‘पेट-२’मध्येही 'सहकार', गुगल भाषांतरीत प्रश्नांनी विद्यार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 10:30 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's PET-2 Exam एकूण ४५ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

ठळक मुद्दे६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिला ऑनलाइन पेपर

औरंगाबाद : किरकोळ तांत्रिक अडचणी व काही विद्याशाखांच्या पेपरमध्ये गुगल भाषांतरीत चुकीचे शब्द सोडले, तर शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेला ‘पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा (पेट-२) दुसरा पेपर सुरळीत पार पडला. मात्र, याही पेपरमध्ये अनेक ठिकाणी सामूहिक कॉपी, उत्तरांसाठी तज्ज्ञाचे सहकार्य. नातेवाइकांकडून मदतीचे प्रकार घडले.

विद्यापीठाने शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान ‘पेट-२’चे आयोजन केले होते. ही ऑनलाइन परीक्षा ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी दिली. एकूण ४५ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत सुरुवातीला विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर परीक्षा क्रमांक व पासवर्ड टाकल्यानंतर विद्याशाखा निवडायची असते. मात्र, स्क्रीनवर अनेक विद्याशाखा दिसतच नव्हत्या. थोड्यावेळाने विद्याशाखा दिसल्या, तर विषय दिसत नव्हते. मग, हळूहळू विषयांची यादी अपलोड होत गेली. यासाठी सुरुवातीला २० ते २५ मिनिटे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. वृत्तपत्र विद्याशाखेच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांची पर्यायी उत्तरे चुकीची देण्यात आली होती, तर अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गुगल भाषांतरीत प्रश्न व पर्यायी उत्तरे चुकीची होती.

शनिवारी १३ मार्च रोजी सकाळी १० ते १ दरम्यान दुसरा पेपर घेण्यात आला. या पेपरसाठी ६ हजार ३८३ विद्यार्थ्यांपैकी केवळ ११० जण अनुपस्थित होते. या पेपरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी विद्यापीठाने अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे व उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांना नियुक्त केले होते.

१७ मार्च रोजी निकालपरीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, ‘पेट’च्या पहिल्या पेपरप्रमाणेच शनिवारचा दुसरा पेपरही मोबाइल, लॅपटॉप अथवा संगणकावर ऑनलाइन सोडविण्याची मुभा होती. या परीक्षेत १०० गुणांचे १०० प्रश्न होते. या परीक्षेसाठी सकाळी १० ते १ दरम्यानची वेळ विद्यापीठाने निश्चित केलेली असली, तरी एकदा लॉगिन झाल्यावर विद्यार्थ्यांना ९० मिनिटातच पेपर सोडविणे बंधनकारक होते. या पेपरचा निकाल १७ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी