शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यवेक्षीय यंत्रणेच्या कामांचे होणार मूल्यमापन

By admin | Updated: October 19, 2014 00:21 IST

भूम : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गतिमान व कार्यक्षम प्रशासन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून, याअंतर्गत पर्यवेक्षिय यंत्रणेच्या कामांचे पारदर्शी

भूम : येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘गतिमान व कार्यक्षम प्रशासन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून, याअंतर्गत पर्यवेक्षिय यंत्रणेच्या कामांचे पारदर्शी व वस्तुनिष्ठ मुल्यांकन करण्यात येऊन त्याआधारे गोपनीय अहवाल लिहिले जाणार आहेत.तालुक्यात जिल्हा परिषद आणि खाजगी अशा १७१ शाळा असून, शाळांसोबतच पर्यवेक्षीय काम पाहणारे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या कामात गतिमानता येण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या दहा मुद्यांची तपासणी करून त्यानुसार शंभर पैकी गुण दिले जाणार असून, या गुणांवर त्यांची गुणवत्ता निश्चित केली जाणार आहे. यात ८१ ते १०० गुण घेणाऱ्यास ‘अ’ ेणी, ७१ ते ८० गुणांसाठी ‘ब’, ६१ ते ७० साठी ‘क’ तर ५१ ते ६० गुणांसाठी ‘ड’ श्रेणी निश्चित केली जाणार आहे. सदर गुणांकन हे मानके, माझी समृध्द शाळा, ई-लर्निंग आणि डिजीटल स्कूल, पर्यवेक्षिय यंत्रणेकडून झालेल्या शाळा तपासणी व भेटी आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. याशिवाय पर्यवेक्षिय यंत्रणेची वरिष्ठ कार्यालयास अचूक व वेळेवर माहिती देणे याही मुद्यावर तपासणी केली जाणार असून, यात प्रामुख्याने विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी, अचूक यू डायस माहिती भरणे, नवोपक्रम, लेखा आक्षेप पूर्तता या मुद्यांना प्रत्येकी दोन गुण दिले जाणार आहेत. तसेच कोणत्या केंद्रातील अथवा शाळेतील किती विद्यार्थी शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले, याच्या टक्केवारीनुसारही गुण दिले जाणार आहेत. याशिवाय नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘कन्या सुरक्षा कवच’ या उपक्रमालाही या मुल्यांकनात दहा गुण दिले जाणार आहेत.यात प्रामुख्याने शायांचा सहभाग, प्रभावी अंमलबजावणी, वरिष्ठ कार्यालयाने सूचविल्याव्यतिरिक्त केंद्राने तसेच बीटने कार्यान्वित केलेले उपक्रम आणि फोटोसह अहवाल या मुद्यांचा समावेश राहणार आहे. (वार्ताहर)