शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलीस, महसूल ...

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यादृष्टीने पोलीस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांच्या प्रतिनिधींना आवश्यक असलेल्या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तत्पर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात कायदा, सुव्यवस्था व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आदींची उपस्थिती होती.

परवानगीसाठी एक खिडकी योजना

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीसाठी तात्पुरते प्रचार कार्यालय, वाहन परवाना, होर्डिंग, बॅनर, झेंडे, पोस्टर, ध्वनिक्षेपक, मिरवणूक, रॅली, रोड शो, जाहीर सभा, राजकीय पक्षांच्या बैठका, चौक सभा आदींच्या परवानग्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधा सुरू केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या प्रकरणांवर तात्काळ प्रक्रिया करावी, जेणेकरून राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेत योग्य समन्वय राखून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

राजकीय पक्षांशी जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी मंगळवारी संवाद साधला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व सुविधांबाबत उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीस डॉ. कल्याण काळे, डॉ. भाऊसाहेब जगताप, राजेश मेहता, नितीन बागवे, विजय औताडे आदींची उपस्थिती होती.