शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी रोखण्यासाठी ७ फिरत्या पथकांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:25 IST

पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातून होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांनी सात फिरत्या पथकांची स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण तालुक्यातील गोदावरी पात्रातून होणारे वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांनी सात फिरत्या पथकांची स्थापना केली आहे. रविवार ते सोमवार दरम्यान कायमस्वरूपी हे पथक गौण खनिजांच्या वाहतूक व उत्खनन करणाºयांवर कारवाई करणार आहे.पैठण तालुक्यातील वाळुपट्ट्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन वेळा लिलाव आयोजित केला, परंतु या लिलावाकडे वाळू ठेकेदारांनी पाठ फिरवली. वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना पैठण तालुक्यातून गोदावरीच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूचोरी सुरू आहे. या प्रकाराने शासनाचा दररोज महसूल बुडत आहे.सोमवारी नायब तहसीलदार आनंद बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सुद्रीक, सांगळे, गाडे, नितीन जाधव, शिवाजी गायकवाड, भागवत कसाब यांचे पथक कार्यान्वित राहणार आहे. मंगळवारी नायब तहसीलदार एन.एस. फोलाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गोसावी, गोजरे, ढोरमारे, सतिश घावट, संतोष जाधव व दिपक नवगिरे यांचे, बुधवारी नायब तहसीलदार उदय मानवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राजपूत, शेख, वाघ, सागर गांगवे, अनिल मिसाळ, दशरथ मिसाळ यांचे, गुरूवारी नायब तहसीलदार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मानघरे, आठवले, सरोदे, जितेंद्र जाधव, अर्जुन जाधव, राम घुले यांचे, शुक्रवारी मंडळ अधिकारी शैलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी राठोड, फटांगडे, पुपले, आंबेकर, अनिल घोडके, दादासाहेब एडके यांचे, शनिवारी मंडळ अधिकारी संभाजी थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी जमादार, हुग्गे, बोंद्रे, घुगे, अनिल हातागळे, अनिल दळवे यांचे व रविवारी मंडळ अधिकारी सुखानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी तारडे, जोशी , महालकर,शेट्टी, कोल्हे, बिडवे यांचे पथक कारवाई करणार आहे.पथकासोबत सशस्त्र पोलीसया पथकासोबत दररोज दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येणार असून बंदोबस्त देण्याबाबत पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांना पत्र दिले आहे, असे तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितले. पथकासोबत सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांनी सांगितले.