वाशी : शासनाच्या वतीने सध्या विविध योजना शेतकरी कृषी गटाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून गटांची स्थापना करण्यावर भर दिला जात आहे. वाशी तालुक्यातील ५४ गावांमध्ये १२३२ गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असता आजवर १०६० गटांची स्थापना करण्यात आली आहे.मागील काही वर्षांपासून शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. बहुतांश योजना शेतकरी गटांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून प्रत्येक तालुक्याला गटांची स्थापना करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वाशी तालुक्यातील ५४ गावांतून १ हजार २३२ गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जागृतीही करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम म्हणून तालुक्यामध्ये आजवर १ हजार ६० शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. आणखी दोनशे ते अडीचशे गटांची स्थापना करणे बाकी आहे. सदरील उद्दिष्ट पूर्तीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)
१०६० शेतकरी गटांची स्थापना
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST